Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शेतकऱ्याचे सोयाबीन चोरटयांनी नेले चोरून
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शेतात कापूण व मळणी करून ठेवलेल्या सोयाबीनवर चोरट्यांनी नजर आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - शेतकऱ्यांनी शेतात कापूण व मळणी करून ठेवले...
  • शेतात कापूण व मळणी करून ठेवलेल्या सोयाबीनवर चोरट्यांनी नजर
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
शेतकऱ्यांनी शेतात कापूण व मळणी करून ठेवलेले सोयाबीन अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना चार्ली शेत शिवारात घडली. कापणी व मळणी करून शेतात ठेवलेले सोयाबीन चोरट्यांनी चोरून नेल्याने हातात आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी नवीन संकटात सापडला आहे. चोरट्यांच्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये भितिचे वातावरणात पसरले आहे. 
चार्ली येथील शेतकरी मनोज मुसळे यांनी आपल्या शेतातील सोयाबीनची मळणी करून रात्र उशीर झाल्यामुळे शेतातच ठेवले. सकाळी शेतात असलेले सोयाबीन पीक घरी आणण्यासाठी गेल्यानंतर पाहिले असता सोयाबीनच्या ढिगातून दोन ते तीन पोती सोयाबीन चोरून नेल्याचे उघडकीस आले. शेतातील काढलेले सोयाबीन पीक अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे परीसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाला तोंड देत लहान मुलाप्रमाणे शेत पिकांना वाढवून त्याची जोपासना करीत असतो, कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे तोंडाजवळ आलेला घास हिराविले जातो यालाही समोर जात शेतकरी पीक वाचविण्याच्या धडपडीत असताना दारवर्षीपेक्षा यावर्षी ओयाबिन पिकाला असलेला दर चांगला असल्याने चोरट्यांचे लक्ष सोयाबीन पिकांकडे लागले असून अस्या चोरट्यांवर आळा घालण्याची मागणी शेतकरी करीत आहे.








Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top