गडचांदूर -
उत्तर प्रदेशातील लखीमपुर-खीरी येथे वाहनाद्वारे शेतकऱ्यांना चीरडून मारल्या प्रकरणी महाराष्ट्रातील महा विकास आघाडी सरकार चे घटक पक्ष शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार, जनशक्ती पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने गडचांदूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सोमवार दिनांक 11 ऑक्टोबर 2021 रोजी होणाऱ्या बंगला समर्थन म्हणून गडचांदूर व्यापारपेठ संपूर्णपणे बंद बाबत संयुक्त निवेदन महाविकास आघाडीच्या घटक पक्ष द्वारे देण्यात आले होते. सकाळपासूनच काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पदाधिकारी रस्त्यावर फिरून बंद बाबत घोषणा देत होते. भाजीपाला व इतर अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली होती. बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचे आयोजकांनी सांगितले.
बंद यशस्वी करण्याकरिता काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव थीपे, नगराध्यक्ष सविता टेकाम, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अरुण निमजे, शिवसेना तालुका प्रमुख गटनेता सागर ठाकुरवार, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष शरद जोगी, प्रहार चे सतीश बिडकर, ज्येष्ठ नगरसेवक पापया पॉन्नमवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष संतोष महाडोळे, शिवसेना शहर प्रमुख अक्षय गोरे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष आकाश बऱ्हाटे, काँग्रेसचे गटनेता विक्रम येरणे, राष्ट्रवादीच्या गटनेता कल्पना निमजे, सभापती राहुल उमरें, सभापती अर्चना वांढरे, उपसभापती वैशाली गोरे, नगरसेविका जयश्री ताकसांडे, सौ. कोडापे, सौ. किरण अहिरकर, सौ मीनाक्षी एकरे, सौ अश्विनी कांबळे, नगरसेवक शेख सरवर, अरविंद मेश्राम, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शैलेश भाऊ लोखंडे, शहर अध्यक्ष रुपेश भाऊ चूदरी, रफिक निजामी, रोहित शिंगाडे, प्रवीण ठाकरे, अनिल अर्कीलवर, प्रणित अहीरकर, अतुल गोरे, मयूर एकरे, शंकर झिल्पे, यश ठाकुरवार आणि महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.