Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गडचांदूर पोलिसांनी लावले बैलबंडीला रेडियम स्टिकर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अंधारत बैलबंडीला होणारे अपघात टाळण्याकरिता ठाणेदार सत्यजित आमले स्वतः उतरले रस्त्यावर धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - मा...
  • अंधारत बैलबंडीला होणारे अपघात टाळण्याकरिता ठाणेदार सत्यजित आमले स्वतः उतरले रस्त्यावर
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
मागील काही दिवसात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस अंधार पडल्यानंतर शेतकरी त्यांची बैलबंडी घेऊन मेन रोडने शेतातून घरी परत येत असताना रोडवर चालणारे वाहनांना रोडवरील बैलबंडी न दिसल्यामुळे गंभीर अपघात झाले. त्या दोन अपघातांमध्ये बैलबंडी वरील शेतकर्‍यासह त्यांचे बैल मरण पावल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. अशा प्रकारचे दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलीस स्टेशन गडचांदूर कडून मोहीम राबवून गडचांदूर शहरात शेत शिवारातून येणाऱ्या बैलबंडीना थांबवून बैलबंडीला रेडियम स्टिकर स्वतः गडचांदूर पोलिसांनी चिटकवले सदर चे कर्तव्य ठाणेदार सत्यजित आमले साहेब, पोलीस कर्मचारी सुभाष तिवारी, धर्मराज मुंडे, व्यंकटेश भटलाडे यांनी बैलबंडीला रेडियम स्टिकर लावण्याचे काम पार पाडले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top