राजुरा -
महावितरणच्या पथकाने शहरातील आंबेडकर चौक वॉर्डातील वीजचोरी पकडली. मिळालेल्या माहितीनुसार उपकार्यकारी अभियंता अनिल पेंदोर चंद्रपूर यांच्या नेतृत्वात निघालेल्या महावितरणच्या चमूने आंबेडकर चौक वॉर्डातील जोगिंदर चहारे यांच्या घरगुती वीज मीटरची तपासणी केली असता त्यांच्याकडे महावितरण कंपनीकडून दिलेला कुठलाही अधिकृत वीजपुरवठा आढळला नाही. यावरून वीजपुरवठा कुठून येत आहे याची तपासणी केली असता विद्युत पुरवठा करणाऱ्या लघुदाब विद्युत वाहिनीवर आकोडा टाकून त्याचे टोक घराच्या स्विचबोर्डला जोडलेले दिसले. यावरून महावितरणच्या पथकाने २२२० युनिटची चोरी २७९६० रुपये तडजोडीनुसार चार हजार रुपये अशी काढली. वीजेची चोरी करणाऱ्या ग्राहकांविरुध्द महावितरण कंपनीच्या कायदयानुसार दंडात्मक कारवाई करण्यात यावी याकरिता भारतीय विद्युत कायदा २००३ सुधारित २००७ कलम १३५ नुसार मर्ग दाखल करण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.