- तालुक्यातील 63 गावांपैकी 9 गावांनी एकच सार्वजनिक गणपती बसवण्यासाठी घेतला पुढाकार
कोरपना -
कोरपना तालुक्यातील कोरपना पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या 63 गावातील आढावा गावागावांत शांतता व सुव्यवस्था राहून सामाजिक सलोखा टिकावा तसेच भांडण, तंट्याचा मागमूसही नसावा. शिवाय गावात एकतेची भावना वृद्धिंगत व्हावी या उद्दात हेतूने गेल्या अनेक वर्षांपासून ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबवली जात असून यंदाच्या गणेशोत्सवात कोरपना पोलीस स्टेशन अंतर्गत तालुक्यात 9 गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ ची प्रतिष्ठापणा केली जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कोरपना सदाशिव ढाकणे यांनी दिली.
मंडळांकडून तालुक्यातील सोनुर्ली, कोळशी खुर्द, वनसडी, चेन्नई, पिंपरी, नारांडा, सावलहीरा, वनोजा, अंतरगाव, आंबाईवाडा या 9 गावांत ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 12 सार्वजनिक गणेश मंडळे असून या मंडळांतर्फे श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत यंदाचा गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. आजपासून गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. आपसातील वैर, प्रभुत्व व शक्तिप्रदर्शनाची जागा दाखविण्याचे ठिकाण मंडळे झाल्याने गणेशमूर्ती प्रतिष्ठापना, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन पोलिस प्रशासनावरचा ताण वाढला होता. वाद झाल्यास कायमची कटुता मनात राहत होती. यामुळे सुरुवातीला प्रशासनावरचा ताण कमी करण्यासाठी व आता कटूता टाळण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन ‘एक गाव, एक गणपती ची संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे.
कोरपना पोलीस स्टेशन अंतर्गत तालुक्यातील 63 गावांपैकी 9 गावांनी एकच सार्वजनिक गणपती बसवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सर्व मंडळांना गणेशमूर्तीची उंची चार फुटांपेक्षा अधिक नसावी. गणेश आगमन, विसर्जनावेळी मिरवणूक काढण्यास पूर्णतः बंदी असून गणपती विसर्जन प्रतिष्ठापणा केलेल्या जागीच करावे. महाप्रसादाचे नियोजन करू नये. या काळात मिरवणूक, गर्दी, कोरोनाचे नियम तोडणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कडक कारवाई केली जाणार आहे. भाविकांनी शांतता राखून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन कोरपनाचे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांनी पोलिस दलाच्या वतीने केले आहे.
ठाणेदारांच्या आवाहनाला गणेश मंडळांचा प्रतिसाद मिळाला असून 21 गणेश मंडळांनी गावात गावाजवळील नाल्यामध्ये विसर्जित गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गावची एकी टिकविण्यासाठी ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबविणाऱ्या गावांचा विशेष गौरव पोलिस दलातर्फे केला जाणार असून त्यांना प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.