राजुरा -
ग्रामपंचायत खामोना अंतर्गत मौजा माथरा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात कोरोना लसीकरण शिबीर घेण्यात आले. सरपंच हरिदास झाडे यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उदघाटन झाले. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वझीर मॅडम, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक गोटमुखले, विभूते, आरोग्य सेविका आसमपल्लीवार व वाकुडकर आणि त्यांची चमू, ग्रामपंचायत उपसरपंच सौ. शारदा जगदीश तलांडे, ग्रामपंचायत सदस्य मारोती चन्ने, सौ. सोनी नवनाथ ठक, सौ. अल्का दिलीप वैद्य, ग्रामसेवक मिलिंद देवगडे, अंगणवाडी सेविका श्रीमती गयाबाई मरसकोल्हे, ग्रामपंचायत कर्मचारी साईनाथ लोणारे, केंद्राचालक संजय बुटले तसेच माथरा येथील नागरिक आवर्जून उपस्थित होते. ग्रामपंचायतीचे सर्वतोपरी प्रयत्न आणि कोरोना दक्षता व लसीकरण समितीने घेतलेल्या मेहनतीमुळे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून लसीकरण 100℅ यशस्वी केले. केंद्रास प्राप्त झालेल्या 414 लसीचे लसीकरण पूर्णपणे करण्यात आले. स्वयंसहायता समूहाच्या महिलांनी देखील लसीकरणात हिरीरीने सहभाग घेतला. एकही लस परत न गेल्याचा आनंद आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर परत जातांना स्पष्टपणे झळकत होता.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.