- वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा
मागील सहा वर्षापासून रक्षा बंधनाचा उत्सव वृक्षांना राख्या बांधून साजरा करीत आहे. वन विकास महामंडळाच्या झरण वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक १०४ मधील रोपवणात ती आपल्या भावंडासह पोहचली. निसर्गाच्या सानिध्यात उभ्या झाडांची तिने पूजा करून आरती केली. प्रथमतः तिने झाडांना राखी बांधून रक्षा बंधनास सुरुवात केली. तिने यावेळी शंभर झाडांना राख्या बांधल्या त्यानंतर आपल्या भावंडाना राख्या बांधल्या. बहीण भावाला राखी बांधून आपल्या आयुष्यात रक्षणाचे वचन मागते. मात्र अपूर्वाने वृक्षांना राख्या बांधून निरोगी जीवन, मोकळा स्वास व समतोल पर्यावरण अबाधित ठेवण्याचे वरदान मागितले. प्रत्येक माणसाने दरवर्षी एक झाड लावून आपली नैसर्गिक जबाबदारी पार पाडली पाहिजे. वृक्ष जगले तर आपण जगू निरोगी आयुष्याची जीवनभर पुरणारी शिदोरी जंगलच असून माणसाच्या अंतिम स्वासनंतर वृक्षच अखेरचा सहकारी बनतो. त्यामुळे झाडांचे रक्षण, संवर्धन करून आपण आपले कुटुंब व आपला गाव निरोगी केला पाहिजे जंगले सध्या नाहीसे होण्याच्या मार्गावर असून त्यासाठी मानव कारणीभूत आहेत. आपल्या गरजा भागविण्यासाठी आपलेच भविष्य काळोखात लोटत आहेत.
कोरोनाच्या महामारीत प्रत्येकाना आक्सिजनची गरज होती मात्र कृत्रिम प्राणवायू माणसांचे जीवन वाचविण्यात अपयशी ठरले. त्यात अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. मोफत मिळणाऱ्या प्राणवायूचे मूल्य प्रत्येकाना उमजले असून आता त्यातील मर्म जाणले पाहिजे हीच उज्वल भविष्याची नांदी आहे. "वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरी" हा संतांचा संदेश मानवांचे जीवन मुल्य आहे.
अपूर्वाने दरवर्षी भावा अगोदर झाडांना राखी बांधून वृक्ष संवर्धन, पर्यावरणाचा अनमोल संदेश देत प्रत्येक भगिनींनी झाडांची काळजी घेतली पाहिजे असा आशावाद व्यक्त करीत आहे. जिवंत असेपर्यंत झाडे लावून त्यांनाच भाऊ समजून अखेरच्या स्वासापर्यंत त्यांच्या सावलीचे वरदान मागणार आहे. भाऊ अनेक कारणापोटी बहिणींना दुरावतील मात्र वृक्ष कधीच दगा देत नाहीत. मायेची सावली सदैव आपल्या सोबतच ठेवत असतात. त्यामुळेच वृक्षच माझे बांधव आहेत असे आवर्जून ती सांगत असते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.