Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: रस्त्यांच्या दुरुस्तीवर चंद्रपुरातील राजकारण तापले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे खड्डयांविरोधात भजन आंदोलन जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांचा मनपा सत्ताधाऱ्यांना इशारा निव्वळ प्रसि...
  • चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे खड्डयांविरोधात भजन आंदोलन
  • जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांचा मनपा सत्ताधाऱ्यांना इशारा
  • निव्वळ प्रसिद्धीसाठी कांग्रेसचे भजन आंदोलन 
  • रस्त्याच्या बांधकामाचा ठराव मार्चमध्येच पारित; केवळ प्रसिद्धीसाठी काँग्रेसचे भजन आंदोलन - महापौर राखी कंचर्लावार
  • पाच महिन्यांपासून फाइल जिल्हाधिकारी कार्यालयात पडून
  • वाचा सविस्तर - पहा व्हिडीओ - काय म्हणाल्या राखीताई कंचर्लावार
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
मंगळवारी शहरातील रस्त्यांची दुरवस्था या विषयावर चंद्रपूरचे राजकारण तापले एकीकडे काँग्रेस ने शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. विकासाचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांचे जनतेच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा खुर्ची खाली करावी, असा इशारा चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी दिला व 
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बागला चौकात भजन आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मनपाच्या कारभारावर संताप व्यक्त करत रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करत भजन मंडळी आणि काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भजन सादर करीत निषेध नोंदविला.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, सेवादल अध्यक्ष नंदू खनके, श्रीनिवास गोमासे, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष सुनीताताई अग्रवाल, माजी महापौर संगीता अमृतकर, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष अश्विनीताई खोब्रागडे, ओबीसी विभागाचे प्रदेश पदाधिकारी उमाकांत धांडे, अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्ष अनुताई दहेगावकर, चंदाताई वैरागडे, माजी नगरसेवक दुर्गेश कोडाम, नगरसेवक पिंकी दीक्षित, माजी नगरसेविका उषाताई धांडे, माजी नगरसेवक राजेश अडूर, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, माजी नगरसेवक राजेश रेवल्लीवार, माजी नगरसेवक बापू अन्सारी, माजी नगरसेवक प्रसन्ना शिरवार, एनएसयूआय प्रदेश महासचिव कुणाल चहारे, अशोक गद्दामवार, एकता गुरले, युसूफ चाचा, रवी भिसे, राज यादव, राहुल चौधरी, पप्पू सिद्दीकी, इरफान शेख, राजीव खजांची, नौशाद शेख, विजय धोबे, प्रवीण डाहुले, प्रीतीशा शाह, संदीप सिडाम, मोनू रामटेके, सलीम भाई, कासिफ अली, केतन दुरसेलवार, हाजी शेख, धर्मेंद्र तिवारी, आकाश तिवारी, नीलेश पुगलिया, अनिस राजा, स्वप्नील केळझरकर, मनीष तिवारी, तवंगर खान, सुरेश गोलेवार, रमेश पारनंदी, संगीता मित्तल, चव्हाण ताई यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

*************

  • रस्त्याच्या बांधकामाचा ठराव मार्चमध्येच पारित; केवळ प्रसिद्धीसाठी काँग्रेसचे भजन आंदोलन - महापौर राखी कंचर्लावार
  • पाच महिन्यांपासून फाइल जिल्हाधिकारी कार्यालयात पडून
चंद्रपूर शहरातील विविध रस्त्यांची कामे नागरी दलित वस्ती सुधार योजनेतून करण्यासाठी महानगर पालिकेच्या चार सदस्यीय समितीने २९ मार्च २०२१ रोजी ठराव पारित केला. ३१ मार्च २०२१ रोजी सदर रस्त्याच्या कामाची फाईल मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवली. त्यामुळे येत्या काळात रस्त्याची कामे होणार आहेत. असे असतानाही केवळ राजकीय भावनेतून आणि प्रसिद्धीसाठी काँग्रेसच्या वतीने मंगळवार, दि. २४ ऑगस्ट रोजी खड्डयांविरोधात भजन आंदोलन करण्यात आले, अशी टीका मनपाच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 
शहरातील बागला चौक ते अंचलेश्वर गेटदरम्यानच्या मार्गाची दुरुस्ती करण्यासाठी यापूर्वीच नागरी दलित वस्ती सुधार योजनेतून ठराव पारित करण्यात आला आहे. सदर रस्त्याच्या कामाची फाईल मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर बांधकामाचे कार्यादेश निघेल. मागील पाच महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात फाइल पडून असल्याने रस्त्याचे काम थांबले आहे, ही वस्तुस्थिती विरोधी पक्षाच्या काँग्रेस नेत्यांना माहिती आहे. तरीही केवळ जनमानसात मनपाच्या कामाबद्दल गैरसमज निर्माण करण्यासाठी काँग्रेसने भजन आंदोलन केले. शहरातील बागला चौक ते अंचलेश्वर गेट दरम्यानच्या रस्त्याची दुरुस्ती जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळताच होईल. रस्त्याचे नुतनीकरण झाल्यानंतर बाबूपेठ, लालपेठ, रयतवारी, महाकाली वॉर्ड, भिवापूर येथील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. येथील नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिका कार्यतत्पर असून, सर्व रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. 

पहा व्हिडीओ - काय म्हणाल्या राखीताई कंचर्लावार









Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top