- यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने रक्षाबंधन व स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन
चंद्रपूर -
रक्षाबंधन या नावातच रक्षा शब्द आहे. त्यामूळे प्रत्येक परिस्थितीत बहिनीची रक्षा करण्याचे हे बंधन असून राखीचा धागा हा केवळ दोरा नसून हे शील, स्नेह आणि पवित्रतेचे रक्षण करणारे बंधन असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. यंग चांदा ब्रिगेेडच्या महिला आघाडीच्या वतीने आज मंगळवारी रक्षाबंधन व स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी यंग चांदा ब्रिगेेडच्या महिला आघाडीच्या शहर संघटिका वंदना हातगावकर, ग्रामिण विभागाच्या महिला अध्यक्षा सायली येरणे, युवती प्रमूख भाग्यश्री हांडे, बहूजन आघाडीच्या महिला प्रमूख विमल कातकार, आदिवासी महिला आघाडीच्या वैशाली मेश्राम, बंगाली समाज आघाडीच्या सविता दंडारे, आशा देशमूख, नंदा पंधरे, शांता धांडे, वैशाली मद्दीवार, शाईन शेख, अनिता झाडे, अस्मिता डोनारकर, स्मिता वैद्य, हजारे, प्रेमीला बावणे, माधुरी निवलकर, कल्पना शिंदे, सिमा विलायतकर आदिंची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, यंग चांदा ब्रिगेड या सामाजिक संघटनेत सक्रिय महिला सदस्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामूळे महिलांच्या समस्या सोडविण्याची मोठी जबाबदारीही या संघटनेवर आहे. या संघटनेची महिला आघाडी उत्तमरित्या काम करत असून या संघटनेचा अध्यक्ष तथा येथील महिलांचा भाऊ म्हणून मी नेहमी त्यांच्या पाठीशी आहे. ही एक संघटना नसुन परिवार आहे. या परिवारातील प्रत्येक महिला ही आंनदी आणि निरोगी असली पाहिजे या दिशेने संघटना काम करत आहे. आजवर संघटनेच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक आरोग्य शिबीरे घेण्यात आली आहे.







टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.