- सास्ती-गोवरी जि.प. क्षेत्रातील मानोली बु. येथील शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश
राजुरा -
शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन संपूर्ण राज्यात शिवसेनेचा जनाधार वाढताना दिसत आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात राजुरा तालुक्यात शिवसेनेत नवयुवकांचे जोरदार इनकमिंग सुरूच आहे. येणाऱ्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीला केंद्रित ठेऊन जिल्हाप्रमुखांनी पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहे. राजुरा तालुक्यात विधानसभा समन्वयक बबनभाऊ उरकुडे यांच्या नेतृत्वात साखरी, अहेरी, बोडखा, साखरवाही नंतर आता मानोली (बूज.) येथे झालेल्या संपर्क अभियानात शेकडो युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
पाचगाव-आर्वी जिप क्षेत्रानंतर आता सास्ती गोवरी जिप क्षेत्रातील गावांमध्ये शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान अंतर्गत मानोली येथील शुभम पेरकांडे, वैभव शेडमाके, प्रमोद वरारकार, कवडू कन्नाके, गणेश अडवे, शुभम कोंडेकर, प्रफुल पाचपुते, शरद मेश्राम, रोशन कोंडेकर, समीर पेरकेंडे, विवेक बोढे, आशिष गोडशेलवार, सूर्यभान देहारकार, रुपेश पिदूरकर, माधवा पेरकेंडे, सुभाष वैद्य, अविनाश झाडे, योगेश मोरे, प्रवीण मत्ते, अमोल विधाते, प्रकाश पेरकेंडे, अतुल पेरकेंडे, प्रदीप पिंपळकर, विकास झाडे, गोलू तुराणकर,अ रुण पेरकेंडे, रोशन पेरकेंडे, प्रफुल अटकर आणि असंख्य नागरिकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना शहर समन्वयक सुनील लेखराजानी, युवा सेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, युवासैनिक गणेश चोथले, अमोल कोसुरकर माजी ग्रामपंचायत सदस्य गोवरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.