Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सीमेंट आणि सीमेंट वर आधारित उद्योगाचे किमान वेतन श्रेणी मध्ये दुरुस्ती करण्यासाठीच विजयक्रांतिचा उदय - शिवानी वडेटटीवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - ग्राम नान्दा येथे विजयक्रांति कंत्राटी कामगार संघटनेचे संवाद सम्मेलन नुकतेच पार पडले. स्...
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
ग्राम नान्दा येथे विजयक्रांति कंत्राटी कामगार संघटनेचे संवाद सम्मेलन नुकतेच पार पडले. स्थानिक अल्ट्राटेक सीमेंट कंपनी मध्ये जानेवारी २०२१ पासून ठेका श्रमिकानी स्वतःची स्वतंत्र विजयक्रांति कंत्राटी कामगार संघटना शिवानी विजय वडेटटीवार यांचे नेतृत्वात स्थापन केली व सहाय्यक कामगर आयुक्त नागपुर येथे नोंदणी करण्यात आली. त्या संघटनेचा पहिला कार्यक्रम काल नान्दा ग्राम येथे पार पडला.
या कार्यक्रमाला संघटनेच्या अध्यक्षा शिवानी वडेटटीवार, गडचिरोली चे माजी नगराध्यक्ष राम मेश्राम, चंद्रपुरच्या माजी नगरध्यक्ष सौ सुनीता लोढ़िया,  जिल्हा कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष प्रकाश देवतळे, नंदु नागरकर नगरसेवक चंद्रपुर, थेमस्कर मैडम, कामगर नेते विजय ठाकरे, किशोर भोयर, गौतम भसारकर, रोहित सिंगाड़े माजी शहरध्यक्ष कांग्रेस कमेटी गड़चांदुर व अन्य प्रमुख पाहुणे उपस्थित होते. 
संघाच्या अध्यक्ष्या शिवानी वडेटटीवार यांनी आपल्या संबोधनात कामगार संघटनेची पुढील दिशा व आक्रमक भूमिका स्पष्ट केली. त्या पुढे म्हणाल्या की सीमेंट उद्योगातील स्थाई कामगारांना वेज बोर्ड अवार्ड अनुसार वेतन देण्यात येते आहे व ठेका श्रमिक जे कंपन्यांचे मुख्य मसल पावर आहे ज्यांच्या मेहनतीच्या भरोस्यावार अफाट मुनाफा कामवितात त्यांचे मात्र शोषण केल्या जात आहे ही प्रथा मोडण्याचा संकल्प विजयक्रांति कामगर संघाचा आहे. शासन दरबारी जी लाल फीताशाही बसली आहे त्या पैकी काही अधिकारी वर्गाला हाताशी धरून सन 29 एप्रिल 1994 रोजी सीमेंट कंपन्यानी आपल्या सोईनुसार सीमेंट व सीमेंटवर आधारित उद्योगाचे किमान वेतन निश्चित करण्यात आले त्या वेळेस याचे परिणाम-दुष्परिणाम याचा गांभीर्याने विचार करण्यात आला नाही आणि त्यामुळे सीमेंट उद्योगतील ठेका श्रमिकांचे शोषण होत आले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.  
या निर्णयामुळे सीमेंट कंपण्याचे खुप फावले तर सीमेंटवर आधारित इतर सुक्ष्म व लघु उद्योगाला हे किमान वेतन परवडनारे नसल्याने ते कोर्ट कचेरीत जाऊन मनाई हुकुम आणून वाढीव वेतन वाढ रोकुन धरायचे, वर्षानुवर्ष सदर स्टेआर्डर कोर्ट कचेरीत पडून राहते मात्र त्याकडे कामगर मंत्रालयातील अधिकारी त्या स्टे आर्डर चे नेमके काय झाले याकडे देखील लक्ष घालत नाही, नेमकी हीच विसंगति आम्हाला दूर करायची आहे आणि म्हणून किमान वेतन सूचीमध्ये दुरुस्ती होने फार महत्चपूर्ण आहे असे आम्हाला वाटतेम्हणून पालकमंत्री विजय वडेटटीवार व राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांचे मार्गदर्शनात सदर बाब शासन दरबारी लाऊन सीमेंट उद्योगतील ठेका श्रमिकाना न्याय मिळवून दिल्या शिवाय स्वस्त बसणार नाही असे प्रतिपादन त्यांनी कामगार संवाद कार्यक्रमात आपल्या भाषणातून व्यक्त केले. 
या कामगार संवाद कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता विजयक्रांति कंत्राटी कामगार संघाचे महासचिव सुनील ढवस, उपाध्यक्ष दशरत राउत, दिलीप झाड़े, विलास निब्रत, हरिदास पुनवतकर, दिनकर चौधरी, अनिल खोके, विलास डावले, रविन्द्र वालके, आरिफ शेख यानी परिश्रम घेतले कार्यक्रमात शेकडोच्या संख्येत कामगार उपस्थित होते. 





Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top