- महानगर भाजपाचे शंखनाद आंदोलन
चंद्रपूर -
कोरोनामुळे लावण्यात आलेला लॉकडाउन चा काळ संपला आहे, राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरणही झाले आहे. या मोहिमेत जनतेंनी शासनाला सहकार्य केले. शासनाने इतर सर्व बाबतीत नियम व बंधन घालून जनतेला मोकळीक दिली, परंतु धार्मीकस्थळांना अजूनही बंदच ठेवले आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणारे नाही. जनतेच्या भावना लक्षात घेता चंद्रपूरसह राज्यातील सर्व धार्मिक पूजा, प्रार्थना स्थळ व मंदिरं त्वरित खुले करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी, चंद्रपुर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी केली ते श्री लक्ष्मी नारायण मंदिर परिसरात महानगर भाजपाच्यावतीने आयोजित शंखनाद आंदोलनाचे नेतृत्व करतांना सोमवार (30ऑगस्ट) ला बोलत होते.
माजी अर्थमंत्री आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या आंदोलनात भाजपा आध्यत्मिक मोर्चाचे पूर्व विदर्भ संयोजक शिल्पा देशकर, भाजपा नेते विजय राऊत, संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार, रवींद्र गुरनुले, ब्रिजभूषण पाझारे, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, भाजपा आध्यत्मिक मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ शैलेंद्र शुक्ला, भाजपा नेते, रामपाल सिंह, विनोद शेरकी, सचिन कोतपल्लीवार, दिनकर सोमलकर, अरुण तिखे, बाळू कोलनकर, धनराज कोवे, प्रज्ञा गंधेवार, मंजुश्री कासंगोट्टूवार, रेणुका घोडेस्वार, भारती दुधानी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ.गुलवाडे म्हणाले, मार्च 2020 पासून कोरोनामुळे राज्यातील सर्व धार्मिकस्थळांवर सामान्य जनतेची ये जा बंद करण्यात आली आहे.किमान 17 महिन्यांपासून ही धर्मस्थळे व प्रार्थनास्थळे बंद असल्याने त्याचा विपरीत परिणाम तेथे व्यवसाय करणाऱ्या छोट्या पूजा साहित्य, फुल,फळ विक्रेत्यांवर झाला आहे. सर्व धार्मिक स्थळे खुली करावी म्हणून शंखनाद आंदोलन केले जात आहे. भारतात विविध धर्म व त्या धर्मातील सणवार या मुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते. त्याच प्रमाणे धार्मीकस्थळांचे पर्यटनही यात महत्वाची भूमिका बजावतात. परंतु शासनाचे या विषयाकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाने सर्व क्षेत्रात नियमांचे बंधन घालून सामान्य जनतेला परवानगी दिली आहे. यात मदिरालय, मॉल, चित्रपट गृह इ. चा समावेश आहे. दुर्दैवाने पूजा व आराधना स्थळे शासनाच्या लेखी अजूनही कोरोनाच्या सवटात आहेत.शासनाचे हे धोरण भारतीय संस्कृतीला मारक ठरत आहे. असे ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्रांना निवेदन पाठविण्यात आले. सर्व धार्मिक स्थळांना खुले करण्यात येऊन भारतीय संस्कृतीचे जतन करावे. शासनाने नागरिकांच्या भावनांशी सुरू केलेला खेळ थांबवावा. नागरिकांच्या भावनांची कदर करावी. अन्यथा भारतीय जनता पार्टीला हे आंदोलन अधिक तीव्र करेल असा इशारा निवेदनातून मुख्यमंत्र्यांना देण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.