- हरदोना येथील अपघातात मृतक शेतकऱ्याच्या कुटुंबाला शिवसेनेची मदत
- राजुरा तालुक्यातील हरदोना येथील शेतकरी बीरशाव सिडाम यांचा झाला होता अपघातात दुर्दैवी मृत्यू
- बघा व्हिडीओ - काय म्हणाले शिवसेना तालुका समन्वयक बबनभाऊ उरकुडे
राजुरा -
शेतावरून परत येत असताना भरधाव वेगात येणाऱ्या पिकअपच्या धडकेत हरदोना येथील शेतकरी बीरशाव सिडाम हे जागीच गतप्राण झाले तर बैलबंडीवर जुंपलेले दोन बैल गंभीर जखमी झाले गंभीर जखमी झाले जखमी झालेले बैल आता वाहतीच्या कामी येणार नाही. अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड जमाव असतानासुद्धा शिवसेना नेते विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांनी परिस्थिती आटोक्यात आणून नागरिकांना शांत केले. पीडित कुटुंबाच्या समोर दुःखाचे डोंगर उभे झाले कमवणारा धनी निघून गेल्याने कुटुंबावर संकट कोसळले. या सर्व गोष्टीचा आढावा शिवसेना जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांनी घेऊन त्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आदेश स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले.
त्याच आदेशाचे पालन करत शिवसेनेचे विधानसभा समन्वयक बबन उरकुडे, तालुका समन्वयक वासुदेव चापले, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे यांच्या नेतृत्वात पीडित कुटुंबाला रुपये 10000/- ची आर्थिक मदत करण्यात आली. याप्रसंगी आर्वी ग्रापं सदस्य बंडूभाऊ आईलवार, बालाजी विधाते, गणेश चोथले, संदीप घ्यार, मिथुन नुलावार, हरदोना येथील माजी सरपंच संगीताताई मेश्राम, शांताबाई चिलमूले, शाखाप्रमुख नागेश कुंभरे, जलपती सिडाम, सुधाकर किन्नाके, मारोती मेश्राम, मधुकर चिलमुले, वासुदेव कोडापे, जेमाजी कांबळे,नामदेव हस्ते, संजय मेश्राम, महादेव ढवळे, सुखदेव धोंगळे, जंगू सिडाम यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.