- शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद
गडचांदूर -
नांदाफाटा - आमदार अंतर्गत ४० लक्ष रुपयांचा निधी मंजूर असलेला बिबी-धामणगाव शिवधुरा अखेर अतिक्रमणमुक्त झाला असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
सविस्तर वृत्त असे की, सदर रस्ता नांदा व बिबी येथील शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाचा असून या ठिकाणाहून पावसाळ्यामध्ये शेतात जाता येत नाही. पाच ते सहा महिने रस्ता पूर्णपणे बंद असतो. इतर मार्गाने फेर्या मारून शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्य डोक्यावर घेऊन दोन किलोमीटर पायी चालावे लागते. या रस्त्यावर सुरेश धोटे प्रभाकर डुकरे व मनोहर काठे या शेतकऱ्यांनी तारांचे कुंपण करून अतिक्रमण केले होते. रस्त्याची आवश्यकता असलेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदार कोरपना यांच्याकडे निवेदन सादर करून सदर शिव रस्ता अतिक्रमणमुक्त करून देण्यात यावा अशी मागणी केली. तहसिलदार महेंद्र वाकलेकर यांनी मामलेदार कायद्यांतर्गत २३ मार्चला अतिक्रमण काढून रस्ता वहिवाटीस मोकळा करण्याबाबत आदेश केला. ३१ मार्च २०२१ रोजी महसुल अधिकारी अतिक्रमण हटवून देणार होते. अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांचे अतिक्रमण नसल्याचे नसल्याचे सांगण्यात आले त्यामुळे तहसीलदारांच्या आदेशाला उपविभागीय अधिकारी राजुरा यांनी ३० मार्चला स्थगनादेश दिल्याने सदरचा रस्ता मोकळा होऊ शकला नाही व रस्त्याचे बांधकाम रखडले.
रस्त्याच्या समस्येला प्राधान्य देऊन स्थगनादेश हटवून अतिक्रमण हटविण्याचा आदेश देऊन रस्ता मोकळा करून देण्यासाठी किशोर चौधरी, बबन चौधरी, हेमंत भोयर, पुरुषोत्तम निब्रड, देवराव गिलबिले, महेश राऊत व इतर शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे धाव घेतली व उपविभागीय अधिकारी यांनी नव्याने चौकशी करून आदेश पारित करण्याबाबत आदेश काढला. नव्याने तहसीलदार यांनी मामलेदार कायद्यांतर्गत अतिक्रमण काढण्यासंदर्भात २७ जुलैला आदेश काढला. २० ऑगष्टला आदेश काढून अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांची अपील फेटाळत दिनांक २८ ऑगस्टला जेसीबीच्या सहाय्याने ३३ फूट रस्ता मोकळा करण्यात आला. अतिक्रमण काढते वेळी वादी-प्रतिवादी शेतकऱ्यांसह मंडळ अधिकारी, तलाठी, भुमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी तगडा पोलिस बंदोबस्त होता.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.