- नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी खासदार बाळु धानोरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी
राजुरा -
शहरामध्ये राजुरा - आसीफाबाद - हैदराबाद हा राज्य महामार्ग आहे. यामार्गावरती माल वाहतूक करणाऱ्या रेल्वे गाड्यांचा गेट आहे. या रेल्वे ट्रॅक वरून मानिकगड सिमेट, अंबुजा सिंमेट, अल्ट्राटेक सिमेंट, दालमिया सिंमेट तसेच सास्ती रेल्वे साईडींग, पांढरपौनी रेल्वे साइडिंग येथील सिंमेट कोळसा वाहतूक होत असते. या वाहतूकीमूळे दिवसभरात १० ते १५ वेळा प्रत्येकी १५ ते २० मिनिटा करीता रेल्वे गेट बंद असते. आणी त्या रेल्वे गेट च्या पलीकडे शिवाजी महाविदयालय, शासकीय आयटीआय, कॉलेज, टेक्नीकल कॉलेज, बस आगार राजुरा शहरातील प्रमुख बाग, आदर्श विदयालय, एमएसईबी कार्यालय, पॉवर हाऊस, आदिवासी मूला मुलींचे वस्तीगृह, व्यापारी भवन, सुतार समाजाचे समाज भवन आहे. त्या गेट पलीकडे येवढी मोठी रहदारी असल्यामुळे नागरिकानां, विद्यार्थ्यांना, व्यापाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना व प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागतो. या रोडाच्या उजव्या बाजूस अगोदरपासून बोगदा आहे. म्हणून सदर बोगदयाचे काम त्वरीत पूर्ण करावे अश्या मागणीचे निवेदन नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी खासदार बाळु धानोरकर यांच्या दिले आहे.








टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.