- आरोग्य केंद्र सुरू झाल्यावरच शासनाने केलेले 10 कोटी खर्च सार्थक ठरणार
- वेळेवर बांधकाम न केल्यामुळे ठेकेदारावर दंड वसूलीची कारवाई करा
- तातडीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी
गडचांदूर -
नांदा ग्राम पंचायत हे कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी आहे. नांदा येथे मागील २ वर्षापूर्वी पासून प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे. व आता कसे बसे जवळजवळ 90 ते 95% काम पूर्णत्वास आले आहे. ग्रा.पं. नांदा व सभोवतालच्या 5 कि.मी. परिसरातील आवाळपूर, हिरापूर, बिबी, नोकारी, पालगांव, पिंपळगंव, राजूरगुडा, लालगुडा इत्यादी गावांची लोकसंख्या जवळपास 35 ते 40 हजार पर्यंत आहे. या गावातील लोकांच्या आरोग्य सेवेसाठी निर्माणाधीन नांदा प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची गरज आहे.
प्रा.आ. केंद्राचे उर्वरीत बांधकाम व इतर आवश्यक कामे, लागणारी आवश्यक मशीनरीज, फर्निचर, बेड ई-ची युद्ध पातळीवर पूर्तता करणे खुप आवश्यक आहे. तसेच प्रा. आ. केंद्राकरीता लागणारा कर्मचारीवर्ग डॉक्टर्स, नर्सेस, कंपाउंडर, स्वीपर, टेक्नीशियनस यांची नियुक्ती प्रक्रिया सुरु झाली नसल्यामुळे ती तात्काळ सुरु करणे खूप गरजेचे आहे. फेबुर्वारी 2021 पर्यंत या इमारतीचे बांधकाम पूर्ण करून देण्याची मुदत होती. पण अजूनपर्यंत बांधकाम पूर्ण झालेले नाही आहे. ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या इंजिनिअरच्या दुर्लक्ष्यते मुळे प्रा. आ. केंद्राचे काम अजूनही अपूर्णच आहे. सदर ठेकेदारावर वेळेवर पूर्ण बांधकाम न केल्यामुळे दंड वसूलीची कारवाई केली पाहिजे. सरकार ने तिसरी लाट येण्याची भीतीही दर्शवली आहे. डेंग्यू मलेरियाचे रुग्ण ही वाढत असल्याचे दिसत आहे.
मोठे आरोग्य संकट येण्यापूर्वी येत्या अगस्त महिन्यात नांदा येथील प्रा.आ. केंद्र पूर्णसुविधेसह सुरू करण्यात यावी जेणेकरून नांदा आणि जवळपास परीसातील नागरीकांना त्याचा लाभ होईल. राज्य सरकार ने सुरू केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा लाभ ही घेता येईल. लोकसंख्येचे प्रमाण बघता लसीकरण केंद्र स्थापित करून मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करण्याचीही गरज आहे.असे झाल्यावरच शासनाने केलेल्या 10 कोटी रुपयांची खर्च सार्थक होईल.
नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उर्वरीत कामे तात्काळ पूर्ण करून, प्रा. आ. केंद्राकरीता लागणारा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून नांदा येथील प्राथामिक आरोग्य केंद्र येत्या ऑगस्ट पासून सर्व सुविधासह सुरु करण्यात यावी अशी मागणी येथील जि. प. सदस्य शिवचंद्र काळे यांनी मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर, जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपूर, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रपूर, कार्यकारी अधिकारी, बां. वि. जि. प. चंद्रपूर यांच्याकडे केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.