Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: धक्कादायक! अल्पवयीन मुलाची अपहरणानंतर हत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
खंडणीसाठी मागितलं काकाचं शिर कारण... काकाचा काटा काढण्यासाठी भाच्याचा बळी आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी नागपूर - नागपूरमध्ये 15 वर्षीय अल्पवय...

  • खंडणीसाठी मागितलं काकाचं शिर कारण...
  • काकाचा काटा काढण्यासाठी भाच्याचा बळी
आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
नागपूर -

नागपूरमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयडीसीच्या पोलीस स्टेशन हद्दीतून या चिमुकल्या मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे अपहरणानंतर खंडणीसाठी आरोपींनी पैसे न मागता असं काही मागितलं की ते वाचून तुम्हालाही धक्का बसेल. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजू पांडे असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे. त्याचा मृतदेह हुडकेश्वर खुर्द जवळ आढळला. या प्रकरणात सगळ्यात आधी आरोपींनी मुलाचं अपहरण केलं. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी मुलाच्या सुटकेच्या बदल्यात एका व्यक्तीचे शिर कापून आणा अशी मागणी खंडणी म्हणून केली होती.

याचा अधिक तपास केला असता राजूच्या अपहरणामागचं धक्कादायक सत्य समोर आलं. हत्या झालेल्या मुलाच्या काकाने आरोपीच्या आईची छेड काढली होती, असा आरोप होता. याचाच राग मनात धरून आरोपींना गुरुवारी संध्याकाळी राजूचं अपहरण केलं.

तुम्हाला राजू परत हवा असेल तर त्याच्या बदल्यात छेड काढणाऱ्या काकाचं शिर कापा आणि त्याचा फोटो व्हाट्सअपवर पाठवा अशी मागणी आरोपींनी केली आहे. पण अखेर असं न झाल्यामुळे चिमुकल्या राजूचा नाहक बळी गेला.

अधिक माहितीनुसार, एमआयडीसी पोलिसांनी आरोपी सुरज साहू याला बोरखेडी इथून शिताफीने अटक असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिसांनी राजूचा मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर या सगळ्या प्रकारामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top