Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: चिंतनीय परिस्थिती चंद्रपुर जिल्ह्यात कोरोना महाकहर सुरूच
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
1171 नव्याने बाधित ; 16 मृत्यू 24 तासात 382 कोरोनामुक्त ; ॲक्टीव पॉझिटिव्ह 8212 आतापर्यंत 29,162 जणांची कोरोनावर मात वाचा सविस्तर..... श्राव...

  • 1171 नव्याने बाधित ; 16 मृत्यू
  • 24 तासात 382 कोरोनामुक्त ; ॲक्टीव पॉझिटिव्ह 8212
  • आतापर्यंत 29,162 जणांची कोरोनावर मात
  • वाचा सविस्तर.....
श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
जिल्ह्यात मागील 24 तासात 382 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1171 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 16 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 37 हजार 919 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 29 हजार 162 झाली आहे. सध्या 8212 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 16 हजार 119 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 72 हजार 660 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील भिवापुर वॉर्ड येथील 63 वर्षीय महिला, दुर्गापूर येथील 62 वर्षीय महिला, घुटकाला  येथील 60 वर्षीय पुरुष, जवाहरनगर वार्ड राजुरा येथील 57 वर्षीय महिला, चिमूर येथील 65 वर्षीय,  63 वर्षीय व 70 वर्षीय महिला, गोरेगाव जिल्हा गोंदिया येथील 60 वर्षीय महिला, वरोरा येथील 70 वर्षीय महिला, राजुरा येथील 39 वर्षीय पुरुष, बोरगाव, कोरपना येथील 62 वर्षीय महिला, गोवरी राजूरा येथील 65 वर्षीय पुरुष, मोरोशी, नागभिड येथील 74 वर्षीय पुरुष, सिंदेवाही येथील 53 वर्षीय पुरुष, यात्रा वार्ड वरोरा येथील 85 वर्षीय पुरुष व बल्लारपूर येथील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 545 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 498, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 21, यवतमाळ 20, भंडारा एक, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1171 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 432, चंद्रपूर तालुका 60,  बल्लारपूर 15, भद्रावती 79, ब्रम्हपुरी 72, नागभिड 26, सिंदेवाही 32, मूल 22, सावली सात, गोंडपिपरी नऊ, राजूरा 44, चिमूर 125, वरोरा 147, कोरपना 80, जीवती सात व इतर ठिकाणच्या 14 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top