- ॲक्टीव कोरोनाबाधितांची संख्या ६३ हजार
- दिवसभरात ३ हजार ९९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले
नागपूर -
आरटीपीसीआर चाचण्या तीन दिवस बंद ठेवल्यानंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट बघायला मिळाली. दिवसभरात जिल्ह्यात ५ हजार ९९३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर ५७ मृत्यू नोंदवण्यात आले.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर चाचणी केंद्रांवर गर्दी वाढू लागली. त्यामुळे चाचण्यांच्या रिपोर्ट देण्यासाठी लॅबवरचा भार वाढला होता. यासाठी प्रशासनाने तीन दिवस आरटीसीपीआर चाचण्या बंद ठेवत केवळ अॅन्टिजन चाचण्या केल्या. खासगी प्रयोगशाळांमध्ये मात्र आरटीपीसीआर चाचण्या सुरू होत्या. दरम्यान जिल्ह्यात बुधवारी २१ हजार ५५८ चाचण्यांमधून ५ हजार ९९३ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली. यात ३ हजार ६१३ रुग्ण शहरात, तर २ हजार ३७५ रुग्ण ग्रामीणमध्ये नोंदवण्यात आले. अॅक्टिव्ह करोनाबाधितांची संख्या ६३ हजार ५ इतकी झाली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात दिवसभरात ३ हजार ९९३ रुग्ण घरी बरे होऊन परतले. असे असले तरी महिनाभरापूर्वी ९४ टक्क्यांवर असलेला रुग्ण बरे होण्याचा दर ७६.७८ टक्क्यांवर आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.