- विद्युतखंडित करतांना आढळल्यास शिवसेना स्टाईल ने धडा शिकवू - बबन उरकुडे
राजुरा -
राजुरा तालुक्यातील गोवरी गावात वारंवार विद्युत खंडित होण्याचा प्रकार मागील काही दिवसापासून सुरु आहे. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे गावातील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. गावातील पिण्याच्या पाण्याची टाकी कमी क्षमतेची असल्यामुळे व वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे ग्रामस्थांना बरोबर पाणी पुरवठा सुद्धा होत नाही आहे. वारंवार खंडित होत असलेला विद्युत पुरवठा यावर नवनिर्वाचित सरपंच आशाताई उरकुडे व शिवसैनिक बबन उरकुडे यांनी बारकाईने लक्ष दिले असता कोणीतरी विद्युत डीपीमधून अज्ञात इसमाद्वारे जाणूनबुझून लाईट बंद करत असल्याचे प्राथमिकदृष्ट्या लक्षात आले आहे. या गंभीर बाबीची बाब लक्षात येताच संबंधित महावितरण अधिकाऱ्यांना याविषयी माहिती देऊन कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पुन्हा वारंवार गावाची विद्युतखंडित झाल्यास अज्ञात इसमाच्या समाजविघातक हालचालीवर आता शिवसैनिकांनी लक्ष केंद्रित केले असून विद्युतखंडित करतांना आढळल्यास शिवसेना स्टाईल ने धडा शिकवू असा सज्जड इशारा शिवसैनिक बबन उरकुडे यांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.