- आशा घटे आत्महत्या प्रकरण ; आरोपी अजूनही मोकाटच?
- पोलीसांना येतोय तपासात भाषेचा अडथळा
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातिल क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालयातील क्षेत्रीय नियोजन अधिकारी जी पुल्लया यांच्या अपमानास्पद वागणकीूमुळे आशा घटे या युवतीने विष प्राशन करून आत्महत्या केली. आशाची दिनांक 22 मार्च पासून मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर 31 मार्च ला सकाळी तिचे दुर्दैवी निधन झाले. पोलीस तक्रार घेण्यास विलंब लावत असतानाच अखेर वडिलांनीही 1 एप्रिल 2021 ला दिलेल्या लेखी तक्रारी व तपासानंतर दिनांक 4 एप्रिल ला रात्रौ पुल्लया यांच्यावर आशा ला आत्महत्येस प्रवूत्त केल्याचा आरोप ठेवत भा.द.वी. कलम ३०६ अंतर्गत गुन्हा नोंद झाला. परंतु अजूनही पुल्लया पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तर पुल्लया राहत असलेल्या वेकोली च्या वसाहतीच्या शेजारी अन्य भाषिक लोक रहात असल्याने कुठलीही माहिती पोलीसांना मिळालेली नाही. त्यामुळे भाषेचा मोठा अडथळा तपासात येत आहे. पुल्लया राहत असलेल्या वेकोली वसाहतीतील घराला दोन कुलुप लाऊन तो पोलिसांना चकमा देत पसार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वेकोलीच्या क्षेत्रीय नियोजन अधिकारी जी.पुल्लया यांच्या त्रासाला कंटाळून आशा तुळशीराम घटे या प्रकल्पग्रस्त मुलीने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. राजुरा पोलिसांनी अखेर पुल्लया यांच्यावर आत्महत्येस प्रवूत्त केल्याचा गुन्हा नोंद केला. परंतु राजुरा पोलिसांनी पुल्लया यांना अटक करायला तो राहत असलेल्या वेकोली वसाहतीतिल घर गाठले असता त्यांच्या घराला कुलुप लागले होते. तर आजुबाजुला चौकशी केली असता तेथे राहत असलेले लोक हे अन्य भाषिक असल्याने पुल्लया विषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही. तर तो काम करत असलेल्या कार्यालयातून माहिती घेतली असता पुल्लया ने कुठलाही सुट्टिचा अर्ज दिला नसल्याची तोंडी माहिती वेकोली कार्यालयातून राजुरा पोलीसांना मिळाली असल्याची माहिती तपास अधिकारी एस.पी.दरेकर यांनी सांगितली. त्यामुळे शेवटी राजुरा पोलिसांनी पोलीस स्टेशन मार्फत वेकोली कार्यालयाला पत्रव्यवहाराद्वारे पुल्लयाच्या मूळ गावाच्या पत्त्याविषयी माहिती विचारणा केली आहे.
दरम्यान आशा हिच्या वडिलांनी दिलेल्या माहिती नुसार चंद्रपुर जिल्हा ग्रामीण रूग्णालयातून आशा चा शवविचेदन अहवाल राजुरा पोलीस स्टेशनला पाठविल्याची माहिती आहे .दिनांक 4 एप्रिल ला आशा राहत असलेल्या सास्त्ती येथील घराचा मौका पंचनामा झाला असून केवळ आशा च्या सतरा वर्षीय भाऊ गणेश याचे बयान नोंदवने बाकी आहे.
पुल्लया याला तात्काळ अटक करावी यांकरीता राजकीय नेत्यांसह तेली समाजबांधव व इतरही समाजाच्या नागरिकांचे निवेदने व वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू आहे. आशा च्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा नोंद असूनही आरोपी जी.पुल्लया मात्र अजूनही मोकाटच आहे.त्यामुळे सामान्य जनतेत रोष पसरत असून आशा आत्महत्या घटनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वेकोली बल्लारपूर चे क्षेत्रीय महाप्रबंधक सव्यसाची दे मात्र अजूनही पोलिसांच्या अहवालाची प्रतीक्षा करत असून वेकोली मार्फत जी.पुल्लया वर अजूनपावेतो कुठलीही कार्यालयीन कार्यवाही न झाल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. गुन्हा नोंद असून विना परवानगी मुख्यालय सोडनार्या जी.पुल्लया यांच्यावर वेकोली ने तात्काळ कठोर कार्यवाही करावी अशी मागणी तेली युवक मंडळाचे कार्याध्यक्ष बादल बेले यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.