Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्याचे काम तातडीने सुरू करा - लोकनेते आबीद अली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - कोरपना तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील कोरपना जिवती तालुक्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा म...

शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
कोरपना तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील कोरपना जिवती तालुक्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित आहे. चार दशकापूर्वी पाटबंधारे विभागाने वनसडी पकडीगुड्डम हा रस्ता निर्माण केला होता. हा रस्ता कधी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तुटक तुटक कामे करून रस्ता मजबुतीकरण खडीकरण कामे अर्धवट राहिल्यामुळे वाहतुकीसाठी आठ ते दहा गावांना जोडणारा हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत गैरसोयीचा झाल्यामुळे लोकांना अधिक अंतरावरून जाण्याची पाळी आली. यामुळे वेळ आर्थिक फटका नागरिकांना बसायचा तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी आमदार संजय धोटे यांनी कुसळ, धानोली, कारगाव, कमलापूर रस्त्या करिता पाच कोटी वनसडी, पिपर्डा, कारगाव याकरिता सन 2018-19 मध्ये आर्थिक निधीची तरतूद करून कामाला प्रशासकीय मान्यता दिली होती. मात्र वर्क ऑर्डर अभावी काम दोन वर्षापासून रखडल्याने लोकांची गैरसोय होत आहे. हे काम तातडीने सुरू करावे याकरिता लोकनेते आबिद अली यांनी कार्यकारी अभियंता, आमदार सुभाष धोटे यांच्याशी संपर्क करून काम सुरू करा अशी मागणी केली. आमदार सुभाष धोटे यांनी आठ दिवसात या कामाची सुरुवात करू अशी माहिती दिली. अनेक वर्षापासून रस्ते  अपूर्ण बांधकामामुळे विकासाची गती थांबून लोकांना दळणवळणास गैरसोयीचा होता हे विशेष. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top