- लोकप्रिय आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय राजुराचे लोकार्पण
- १२ कोटी ६४ लाख रुपये खर्चून प्रशस्त रुग्णालय जनसेवेसाठी सज्ज
उद्घाटनपर मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी ९ डिसेंबर २०१० रोजी राजुरा येथील कार्यक्रमात श्रेणीवर्धीत १०० खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयाची घोषणा केली होती. त्या घोषणेच फलीत आज राजुरा तालुक्यातील नागरीकांना प्रत्यक्ष पहावयास मिळत आहे. निश्चितपणे हे रुग्णालय क्षेत्रातील जनतेच्या सेवेसाठी मैलाचा दगड ठरणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, नगराध्यक्ष अरुण धोटे, जिल्हा चिकिस्तक निवृत्ती राठोड, कार्यकारी अभियंता संतोष जाधव, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार हरीश गाडे, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे, मुख्याधिकारी अर्शिया जुही, हमीदभाई, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रंजन लांडे, पंस सभापती मुमताज अब्दुल जावेद, पंस उपसभापती मंगेश गुरणुले, सं.नि.यो. अध्यक्ष साईनाथ बतकमवार, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, नंदु वाढई, एजाज अहमद, ॲड सदानंद लांडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. लहू कुलमेथे आणि अभियंता ए.ए.बाजारे, शाखा अभियंता वैभव जोशी, नगरसेवक, काँग्रेसचे विविध शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, रुग्णालय अधिकारी, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निवृत्ती राठोड यांनी तर आभार प्रदर्शन वैद्यकीय अधिक्षक डॉ. लहू कुलमेथे यांनी केले संचालन प्रयोग शाळा तंत्रज्ञ चंद्रकांत नेवलकर यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.