- इंडियन रेडक्रॉस सोसायटी तर्फे जनऔषधी सप्ताह निमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
चंद्रपूर -
चंद्रपुर शहरातील इंडियन रेडक्रॉस सोसायटी तर्फे भारतीय जनऔषधी परियोजने अंतर्गत रक्तदाब तपासणी व मधुमेह तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी इंडियन रेडक्रॉस सोसायटी चे सचिव डॉ मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की आजच्या धावपळीच्या जीवनात माणसाचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी दैनंदिन आरोग्य चाचण्या ह्या महत्वाच्या असून त्या नागरिकांनी काळजीपूर्वक कराव्यात, आज संपूर्ण जगाला कोरोना ने विळखा घातला आहे त्याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहून नियमित आरोग्य चाचण्या कराव्यात असे संदेश शिबिराचा माध्यमातून डॉ. मंगेश गुलवाडे यांनी दिला.
यावेळी डॉ. बी.एच दाभेरे, डॉ प्रफुल भास्करवार, विकास गेडाम, सुभाष मुरस्कर, प्रवीण चंदनखेडे, तेजस्विनी पडवेकर आदी उपस्थिती होते. शेकडो लोकांनी शिबिराचा लाभ घेतला.
![]() |
सामान्य आरोग्य चाचण्यांचे महत्व समझवतांना सुप्रसिद्ध चिकित्सक डॉ. मंगेश गुलवाडे सर |
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.