- अंबुजा सिमेंट फाउन्डेशन, रोटरी क्लब अमरावती, मिडटाऊन मेमोग्राफी तथा डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडीकल कॉलेज अमरावती यांच्या पुढाकार
राजुरा -
तालुक्यातील स्मार्ट ग्राम, मंगी (बु.) येथे 23 फेब्रुवारी ग्राम पंचायत, अंंबुजा सिमेट फाउन्डेशन, रोटरी अमरावती मिडटाऊन मेमोग्राफी तथा डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडीकल कॉलेज, अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने महिलांचे मेमोग्राफी तपासणी शिबीर घेण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेला माल्यार्पण करून शिबीराची सुरुवात करण्यात आली. उदघाटन उपसरपंच वासुदेव चापले यांचे हस्ते झाले. यावेळी ग्राम विकास समिती मंगी चे अध्यक्ष परशुराम तोडासाम, अंबुजा सिमेट फाउन्डेशन जितेंद्र बैस, रोटरी अमरावती मिडटाउन मेमोग्राफी चे व्यवस्थापक उदय निंबोरकर, ग्रापं. सचिव गजानन वंजारे, अंबादास जाधव, सुमन येमुलवार, शंकर तोडासे, सोनबत्ती मडावी, शिल्पा कोडापे, मोतीराम पेंदोर, संगीताताई कोडापे, लिला सिडाम प्रामुख्याने उपस्थित होते.
शिबीरात मेमोग्राफी तपासणीतून महिलांचे स्तनाचे आजार, गर्भाशय व मुखाचा कॅन्सर याबाबत तपासणी करुन निदान करण्याची व्यवस्था शिबीराच्या माध्यमातून करण्यात आली. जवळपास 100 चे वर महिलांची तपासणी करुन संदर्भ सेवेसाठी रिपोर्ट अमरावती येथे पाठविण्यात आली. आरोग्य विषयक शिबीर आयोजनात अंबुजा सिमेंट फाउन्डेशन चा मोलाचा वाटा आहे. असे वासुदेव चापले यांनी मनोगतातून आपले विचार व्यक्त केले.
संचालन जिप शाळेचे मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे, यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शिक्षक सुधीर झाडे, श्रीनिवास गोरे, पंडीत पोटावी, मारोती चापले तथा गावातील नितीन मरस्कोल्हे, चरणदास चिलकुलवार, सुरेश येमुलवार, वसंता सोयाम यांनी मोलाचे सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.