Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोंबड्यांच्या झुंजीचा जुगार पोलिसांनी उधळला; आर्वीत मोठी कारवाई
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नाल्यालगत सुरू होता पैशांचा डाव; तीन कोंबडे मृत अवस्थेत आढळले आमचा विदर्भ - वृत्तसेवा  चंद्रपूर (दि. ०५ नोव्हेंबर २०२६) -         लाठी उपपोल...
नाल्यालगत सुरू होता पैशांचा डाव; तीन कोंबडे मृत अवस्थेत आढळले
आमचा विदर्भ - वृत्तसेवा 
चंद्रपूर (दि. ०५ नोव्हेंबर २०२६) -
        लाठी उपपोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आर्वी परिसरात कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांचा जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळताच लाठी पोलिसांनी धडक कारवाई केली. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, ७ कोंबडे, १२ मोटारसायकली, ४ कात्या आणि रोख रकमेसह एकूण ५ लाख ३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

        लाठी उपपोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अशोक मंजुळकर यांना गोपनीय खबऱ्यामार्फत आर्वी गावाच्या मागील बाजूस नाल्यालगत कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सहकारी कर्मचारी आणि पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळी धाड टाकली. आर्वी गावामागील नाल्याजवळ सुरू असलेल्या कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांचा डाव खेळला जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईदरम्यान समोर आले. घटनास्थळावर दोन आरोपी आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात  प्रवीण सुरेश दरेकर (वय ३५, रा. राजुरा), प्रकाश मोतीराम वानखेडे (वय ६२, रा. विरूर) याना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय घटनास्थळावरून १० मोटारसायकलींचे चालक फरार झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपूर्ण मुद्देमालाची एकूण किंमत ५ लाख ३ हजार ६५० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी लाठी उपपोलीस स्टेशनमध्ये अप. क्र. ६७/२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (ब) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

        पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा सुशांत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. लाठी उपपोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लभाने यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार अशोक मंजुळकर, महिला पोलीस हवालदार सौजन्या जंजिरालावार, पोलीस कॉन्स्टेबल चेतना झाडे आणि वनरक्षक कार्तिकस्वामी केंद्रे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांचा जुगार खेळण्याच्या प्रकाराविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारच्या बेकायदेशीर जुगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

#ChandrapurNews #RajuraNews #ArviNews #LathiPolice #ChandrapurPolice #CockFightGambling #GamblingRaid #Rajura #Virur #ChandrapurCrimeNews #MaharashtraPolice #PoliceAction #AamchaVidarbha #आर्वी #राजुरा #लाठीपोलीस #चंद्रपूरबातम्या #कोंबड्यांच्याझुंजी #जुगारावरकारवाई #पोलीसकारवाई

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top