Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ओपन स्पेसवरील बांधकामाविरोधात महिलांचा आवाज
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बांधकाम तात्काळ थांबवण्याची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा आमचा विदर्भ - वृत्तसेवा  चंद्रपूर (दि. १६ सप्टेंबर २०२६) -         शहरातील ग...
बांधकाम तात्काळ थांबवण्याची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
आमचा विदर्भ - वृत्तसेवा 
चंद्रपूर (दि. १६ सप्टेंबर २०२६) -
        शहरातील गायत्रीनगर, वडगाव फाटा परिसरातील सर्व्हे क्र. ८८/२ मधील मोकळ्या जागेवर सुरू असलेले कथित अवैध बांधकाम तात्काळ थांबवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त अकणुरी नरेश यांच्यासह जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि रामनगर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना निवेदन देण्यात आले आहे. बांधकामाबाबत प्रशासनाने तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात आली आहे.

        गायत्रीनगर, वडगाव फाटा परिसरातील सर्व्हे क्र. ८८/२ मधील ही मोकळी जागा परिसरातील लहान मुले, युवक तसेच नागरिकांकडून अनेक वर्षांपासून खेळ, व्यायाम आणि इतर सार्वजनिक उपक्रमांसाठी वापरली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परिसरातील मुलांसाठी उपलब्ध असलेल्या मोजक्या मोकळ्या जागांपैकी ही एक जागा असल्याने तिचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

        या जागेवर सध्या बांधकाम सुरू असून त्याची परवानगी आणि कायदेशीर स्थिती प्रशासनाने तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हे बांधकाम नेमके कोणाच्या वतीने सुरू आहे, याबाबत स्पष्ट माहिती नसल्याने संबंधित विभागाने पाहणी करून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

ओपन स्पेसचा सार्वजनिक उपयोग कायम ठेवण्याची मागणी
        सदर जागेवर कोणतेही अनधिकृत बांधकाम होऊ न देता परिसरातील नागरिकांच्या उपयोगासाठी ती जागा राखून ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने या ठिकाणी वाचनालय उभारण्याचा प्रस्तावही महिलांकडून मांडण्यात आला आहे. वाचनालयामुळे विद्यार्थी आणि युवकांना अभ्यासासाठी सुविधा उपलब्ध होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.

२०१६ मध्येही झाला होता बांधकामाचा प्रयत्न
        नागरिकांच्या म्हणण्यानुसार, २०१६ मध्येही याच मोकळ्या जागेवर बांधकाम करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी विरोधाची भूमिका घेतल्याने संबंधित बांधकामाचा प्रयत्न थांबवण्यात आला होता. आता पुन्हा त्याच जागेवर बांधकाम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

प्रशासनाकडे निवेदन; आंदोलनाचा इशारा
        सदर बांधकामाबाबत तातडीने पाहणी करून ते नियमानुसार आहे किंवा नाही, याची चौकशी करावी आणि नियमबाह्य असल्यास कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मनपा आयुक्त अकणुरी नरेश, जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

        यासोबतच नगरसेविका प्रतीक्षा येरगुडे, नगरसेवक संजय बल्की आणि मनीषा बोबडे यांनाही निवेदन देऊन या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाकडून बांधकाम थांबवण्यासाठी आवश्यक कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या छाया धनविजय यांनी पत्र परिषदेत दिला. पत्र परिषदेला यशोधरा पोटनवार, डॉ. प्रतिमा खोब्रागडे, माया आमटे आणि अशोक मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नागरिकांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष
        ओपन स्पेसचा वापर, बांधकामाची परवानगी, जागेची मालकी व आरक्षणाची स्थिती याबाबत संबंधित प्रशासनाने अधिकृत माहिती स्पष्ट करणे अपेक्षित आहे. त्यामुळे प्रशासनाच्या पाहणीनंतर या जागेवरील बांधकामाची कायदेशीर स्थिती स्पष्ट होणार आहे. नागरिकांनीही सार्वजनिक वापरासाठी असलेल्या मोकळ्या जागेचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे.

#ChandrapurNews #Chandrapur #ChandrapurCity #Gayatrinagar #WadgaonPhata #ChandrapurMunicipalCorporation #OpenSpace #IllegalConstruction #ChandrapurNewsToday #CitizenIssues #PublicSpace #AamchaVidarbha #VidarbhaNews #MaharashtraNews #LocalNews #Rajura #ChandrapurUpdates

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top