आमचा विदर्भ वृत्त सेवा
राजुरा (दि. ०४ जून २०२६) -
नगर परिषद राजुरा यांच्या वतीने शहरातील चुनाभट्टी वार्ड परिसरात (स्वप्नपूर्तीच्या बाजूला) सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या 'नमो उद्यान' विकासकामाचा शुभारंभ नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमामुळे राजुरा शहरातील नागरिकांना आधुनिक सुविधा असलेले मनोरंजन, विरंगुळा आणि आरोग्य संवर्धनाचे सार्वजनिक केंद्र उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमाला नगर परिषद राजुराच्या बांधकाम सभापती अनु हरजितसिंग संधू, महिला व बालकल्याण सभापती गीताताई पथाडे, शिक्षण सभापती पुनम गिरसावडे, स्वच्छता व आरोग्य सभापती अनंतकुमार ताजने, नगरसेवक सिद्धार्थ पथाडे, मंगला मोकडे, प्रतिष्ठित व्यावसायिक व नगरसेवक किशोर हिंगाणे, इंदूबाई निकोडे, माजी नगरसेवक हरजीतसिंग संधू, अभियंता अमित गावित, विजय बावणे, बांधकाम विभागाचे अधिकारी, अभियंते तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.
नगर परिषद राजुरा शहरातील नागरिकांना अधिकाधिक आधुनिक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने विविध विकासकामे राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 'नमो उद्यान'ची उभारणी करण्यात येत असून या उद्यानामध्ये नागरिकांना सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी, लहान मुलांच्या मनोरंजनासाठी, ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी तसेच सामाजिक संवादासाठी दर्जेदार आणि आकर्षक सार्वजनिक जागा उपलब्ध होणार आहे.
या उद्यानामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन मिळणार असल्याचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी सांगितले. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना हरित आणि स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकल्पांची गरज असल्याचेही यावेळी त्यांनी नमूद आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नगर परिषद राजुरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. आगामी काळात नागरिकांच्या हिताच्या विविध विकासकामांना प्राधान्य देऊन शहराच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बातमीतील महत्त्वाचे मुद्दे
- नगर परिषद राजुरा यांच्या वतीने 'नमो उद्यान' विकासकामाचा शुभारंभ.
- चुनाभट्टी वार्ड परिसरात सुमारे १ कोटी रुपयांच्या खर्चातून उद्यान उभारले जाणार.
- नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांच्या हस्ते भूमिपूजन व शुभारंभ.
- बांधकाम सभापती अनु हरजितसिंग संधू यांच्यासह सर्व सभापती, नगरसेवक, अधिकारी आणि नागरिकांची उपस्थिती.
- उद्यानात मनोरंजन, आरोग्य संवर्धन आणि सामाजिक संवादासाठी आधुनिक सुविधा.
- शहराच्या हरित विकासाला आणि सौंदर्यीकरणाला मिळणार चालना.
- आगामी काळातही विकासकामांना प्राधान्य देण्याचा नगर परिषदेचा निर्धार.
#Rajura #RajuraNews #NamoUdyan #RajuraMunicipalCouncil #ArunDhote #Chandrapur #ChandrapurNews #MaharashtraNews #CityDevelopment #UrbanDevelopment #PublicPark #SmartCity #VidarbhaNews #BreakingNews #राजुरा #राजुरानगरपरिषद #नमोउद्यान #अरुणभाऊधोटे #चंद्रपूर #विकासकाम #सार्वजनिकउद्यान #शहरविकास #महाराष्ट्रन्यूज #स्थानिकबातम्या #ब्रेकिंगन्यूज

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.