आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा / चंद्रपूर (दि. ०१ ऑक्टोबर २०२५) -
बाळू फाउंडेशन राजुरा यांच्या वतीने कुपोषण पे सीधा वार – हम सब है तैयार या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत पाचगाव येथील कोटकागुडा व मडावीगुडा येथील दोन बालकांना पोषण आहाराची बाळू भेट देण्यात आली. हा कार्यक्रम आज दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १२.३० वाजता सौ. काजल तुषार अमरशेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य असे की, जन्मदिन हा केवळ आनंदोत्सव न राहता समाजातील गरजूंसाठी उपयोगी पडावा या उद्देशाने हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमास बाळू फाउंडेशन चे अध्यक्ष अमित महाजनवार, ग्रामपंचायत उपसरपंच उज्वला आत्राम, ग्रामपंचायत सदस्य बाबुराव मडावी, माजी पंचायत समिती सदस्य सुनंदा डोंगे, बाल विकास प्रकल्प अधिकारी अमित मेश्राम, बाळू फाउंडेशन चे सदस्य अक्षय सुर्तेकर, तसेच काजल अमरशेट्टीवार, तुषार अमरशेट्टीवार, छाया अमरशेट्टीवार, मनिषा गंधेवार व पाचगाव क्षेत्रातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य बाबुराव मडावी यांनी सांगितले की, “बाळू फाउंडेशन चे कार्य प्रेरणादायी आहे. समाजातील उपेक्षित घटकांच्या गरजांसाठी अशा प्रकारे पुढाकार घेणे ही खरी सामाजिक सेवा आहे.” सामाजिक कार्यासोबत आध्यात्मिक मूल्येही जोपासत बाळू फाउंडेशन समाजातील प्रत्येक घटकासाठी कार्यरत आहे. जन्मदिन हा समाजोपयोगी कृतीतून साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून मिळतो, असे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.
#BaluFoundation #Rajura #SocialService #ChildNutrition #Inspiration #CommunityWelfare #BirthdayWithPurpose #FightMalnutrition #ameetmahajanwar #baburaomadavi #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.