ब्लॅक डायमंड प्री स्कूलमध्ये आजी-आजोबा दिवस उत्साहात साजरा
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. १४ सप्टेंबर २०२५) -
ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल, राजुरा येथे "तुमच्यामुळे आम्ही आज इथे आहो" या भावस्पर्शी संकल्पनेवर आधारित आजी-आजोबा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून केंद्र संचालक अॅड. मनोज काकडे तसेच शिवाजी हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक देवराव निब्रड उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना आजी-आजोबांच्या मार्गदर्शनाचे, प्रेमाचे आणि अनुभवांचे महत्त्व पटवून देणे हा होता.
शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांसाठी विशेष नृत्य सादर केले. या सादरीकरणांतून मुलांनी आजी-आजोबांप्रती आपले प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली भेटवस्तू व पत्रे देऊन आपली भावना व्यक्त केली. या कार्यक्रमात उपस्थित आजी-आजोबांनी त्यांच्या बालपणाच्या आठवणी आणि संस्कारांची शिकवण नातवंडांना दिली. तसेच बालपणीचे खेळ आजी-आजोबा व नातवंडांनी एकत्र खेळून कार्यक्रमाला वेगळाच रंग दिला. पालकांनी आपल्या आई-वडिलांबद्दल प्रेम व्यक्त करणारा व्हिडिओ दाखवण्यात आला, ज्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले आणि टाळ्यांचा गडगडाट झाला. आजी-आजोबांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, "नातवंडांच्या जगाचा भाग होणे हे आमच्यासाठी सर्वात मोठे भाग्य आहे. शाळेने दिलेल्या या संधीबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत."
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सल्लागार सदस्य संदीप मालेकर, जयश्री मालेकर, विधाता फाउंडेशनच्या अध्यक्षा शुभांगी धोटे, शाखा प्रमुख सीमा आमटे, तसेच सहाय्यक शिक्षिका आलिशा सय्यद, प्रीती सिंग, फिजा शेख, स्नेहल कोंडावार, ममता चव्हाण, मोनिका, काजल सिंग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच याकरिता मदतनीस ममता, अर्चना आणि सुषमाताई यांचेही सहकार्य लाभले. पालकांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करून असे सांगितले की, "ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल केवळ शैक्षणिकच नव्हे तर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तम वातावरण निर्माण करीत आहे."
#GrandparentsDay #BDIPSRajura #BecauseOfYou #FamilyBond #GenerationalLove #SchoolEvent #KidsAndGrandparents #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.