आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. १३ सप्टेंबर २०२५) -
महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक व लोकाभिमुख कार्यपद्धतीनुसार महसूल व वन विभागाकडून ग्रामीण भागातील रस्त्यांचे सिमांकन, क्रमांकन आणि अभिलेख अद्ययावत करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या निर्णयानुसार राजुरा तालुक्यातील ४ मंडळातील पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण सुरू झाले असून त्याअंतर्गत ग्रामीण गाडीमार्ग, पायमार्ग, शिवरस्ते, शेतपाणंद रस्ते आणि इतर मार्गांचे अद्ययावत नोंदणीपत्र तयार केले जाणार आहे.
भूमी अभिलेख कार्यालयाकडून रस्त्यांचे सिमांकन करून त्यांना विशिष्ट क्रमांक देणे आणि या रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना शेतात ये-जा करणे सुलभ होईल, शेतीतील यांत्रिक साधनांचा वापर सोयीस्कर होईल तसेच अनाधिकृत अतिक्रमणावर आळा बसेल.
उपक्रमांचे टप्पे
- पहिला टप्पा (17 ते 22 सप्टेंबर 2025): ग्रामीण रस्त्यांचे सर्वेक्षण, सिमांकन व क्रमांकन.
- दुसरा टप्पा (23 ते 27 सप्टेंबर 2025): सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कब्जेहक्काने शासकीय जमीन व पट्टे वाटप.
- तिसरा टप्पा (28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025): वर्ग-2 झालेल्या शेतजमिनींचा निपटारा.
महसूली लोक अदालतीचे आयोजन
दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय, राजुरा येथे महसूली लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तहसिल कार्यालय व उपविभागीय कार्यालय राजुरा अंतर्गत असलेली प्रलंबित महसूली प्रकरणे आपसी तडजोडीनुसार त्याच दिवशी निकाली काढली जातील. याकरिता नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शासकीय योजनांचे शिबिर
दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालय, राजुरा येथे विविध विभागांच्या शासकीय योजनांचा लाभ एकत्रित देण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व शेतकरी, महिला व नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन शासकीय सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या वेळी सर्व शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून माहिती व सेवा उपलब्ध करून देतील.
#RajuraDevelopment #GraminRoads #HousingForAll #RevenueCourt #PublicWelfare #RajuraProgress #GovernmentForPeople #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.