Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शिक्षण, साहित्य, पत्रकारिता – प्रा. शेंडे यांचे बहुआयामी योगदान
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शिक्षण, साहित्य, पत्रकारिता – प्रा. शेंडे यांचे बहुआयामी योगदान प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी राज्यस्तरीय SET परीक्षेत मिळवले यश आमचा विदर्भ - ...
शिक्षण, साहित्य, पत्रकारिता – प्रा. शेंडे यांचे बहुआयामी योगदान
प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी राज्यस्तरीय SET परीक्षेत मिळवले यश
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ०१ सप्टेंबर २०२५) -
        तालुक्यातील गुरूदेव नगर वार्ड, धोपटाळा येथील रहिवासी प्रा. प्रफुल्ल राजेश्वर शेंडे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ द्वारा दिनांक १५ जून २०२५ रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) मराठी विषयात उल्लेखनीय यश संपादन करून प्राध्यापक पदाकरिता पात्रता मिळवली आहे.

        या परीक्षेत ९० हजारांहून अधिक विद्यार्थी बसले होते. अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत केवळ ६.६९ टक्के विद्यार्थीच पात्र ठरले असून त्यामध्ये प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी उत्तुंग यश मिळवले आहे. यापूर्वी त्यांनी २०१५-१६ साली राज्यशास्त्र विषयात SET परीक्षा उत्तीर्ण केली होती. तब्बल १० वर्षांनी पुन्हा दुसऱ्याच प्रयत्नात मराठी विषयातून यश मिळवत त्यांनी प्राध्यापक पदाकरिता दुहेरी पात्रता मिळवली आहे. दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर झालेल्या निकालात त्यांचे नाव पात्र उमेदवारांमध्ये घोषित करण्यात आले.

प्रा. प्रफुल्ल शेंडे यांचा शैक्षणिक प्रवास -
  • शालेय शिक्षण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल, गडीसुर्ला (मूल तालुका)
  • कनिष्ठ महाविद्यालय : जिल्हा परिषद ज्युनियर कॉलेज, राजुरा
  • बी.ए. : श्री. शिवाजी महाविद्यालय, राजुरा
  • एम.ए. (मराठी) : एस. पी. कॉलेज, चंद्रपूर (२००५)
  • बी.एड. : जनता शिक्षण महाविद्यालय, चंद्रपूर

        सन २००६ पासून प्रा. शेंडे विविध महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक तसेच कार्यकारी प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. ते ४ विषयात एम.ए. उत्तीर्ण असून मागील १५ वर्षांपासून पत्रकारिता, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत.

        प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी आपल्या यशाचे श्रेय आजी-आजोबा स्व. सखुबाई बेले, स्व. जैराम बेले, स्व. कृष्णाजी शेंडे, स्व. गंगुबाई शेंडे, आई स्व. निर्मला राजेश्वर शेंडे, वडील राजेशराव कृष्णाजी शेंडे, भाऊ-बहीण, काका-काकू, मामा-मामी, मावशी यांचे आशीर्वाद, पत्नी सौ. सुषमा प्रफुल्ल शेंडे, मुलगा प्रसून प्रफुल्ल शेंडे यांचे सहकार्य आणि सहकारी प्राध्यापकवृंद यांच्या मार्गदर्शनाला दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, सहकारी, मित्र परिवार तसेच समाजातील विविध स्तरातून प्रचंड अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


#ProfPrafullShende #RajuraTalent #SETExam2025 #MarathiSubject #EducationalAchievement #Inspiration #AcademicSuccess #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top