Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: रामपुरच्या गणेशोत्सवात वेकोली खाणीचा देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रामपुरच्या गणेशोत्सवात वेकोली खाणीचा देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू घटे कुटुंबीयांनी गणेशोत्सवातून कोळसा खाणीचे वास्तव केले उभे  वेकोलीच्...
रामपुरच्या गणेशोत्सवात वेकोली खाणीचा देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
घटे कुटुंबीयांनी गणेशोत्सवातून कोळसा खाणीचे वास्तव केले उभे 
वेकोलीच्या बंद-खुल्या खाणींचा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०१ सप्टेंबर २०२५) -
        रामपुर येथील रामचंद्र घटे यांच्या घरी मागील तीस वर्षांपासून घरगुती गणेश बसतो. पाच दिवस भक्तीमय वातावरणात सामाजिक जनजागृतीचे विविध संदेश देणारे देखावे साकारले जातात. यावर्षी घटे कुटुंबीयांनी आपल्या कार्यक्षेत्राशी संबंधित वेकोलीच्या बंद व खुल्या कोळसा खाणीचा देखावा उभारून परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले.
        घटे परिवारातील वडील, मुलगा, जावई आणि इतर नातेवाईक मंडळी वेकोली कोळसा खाणीतील कर्मचारी असल्याने या विषयाचा देखावा साकारण्यामागे विशेष प्रेरणा मिळाली. देखाव्यात ऑपरेशन सिन्दुर, खानची रचना, सुरक्षा साहित्य, बल्ली सपोर्ट, चाक सपोर्ट, रोप सपोर्ट, फॉल एरिया, ओबी बेंच, कोल बेंच, कोल स्टॉक, चेक पोस्ट, लायटिंग टॉवर आणि सुरक्षा निर्देश अशा बाबींचा समावेश करून खाणकामातील वास्तवाचे दर्शन घडविण्यात आले.
        यापूर्वी घटे कुटुंबीयांनी प्राचीन किल्ले संवर्धन, जल व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन, भरडधान्य वापराचे महत्त्व, शेतकरी आत्महत्या, कोरोना जनजागृती, स्वच्छता मोहीम अशा विषयांवर आकर्षक देखावे साकारले होते. या कार्यात पत्नी सुनंदा घटे, मुलगा आकाश घटे, सून मानसी घटे, मुलगी वैष्णवी अगळे, जावई योगेश अगळे यांचे विशेष सहकार्य लाभले. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन गणेशोत्सवाबरोबरच सामाजिक संदेश व जनजागृती करणारे उपक्रम राबवित आहे.

#GaneshFestival #SocialAwareness #WCLMines #CoalMiningLife #FamilyTradition #GanpatiDecoration #CulturalAwareness #ramchandraghate #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top