आमचा विदर्भ - प्रवीण चिडे
विरुर स्टे. / राजुरा (दि. १० सप्टेंबर २०२५) -
धानोरा येथे मच्छी तलावात बुडून एक इसमाचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत इसमाचे नाव गुरुदास लखू टेकाम वय अंदाजे ३५ वर्षे असे असून त्याच्या पश्चात दोन लहान मुली व पत्नी असा आप्तपरिवार आहे. अचानक झालेल्या या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
प्राथमिक अंदाजानुसार, तो तलावाच्या काठाने जात असताना पाय घसरला आणि तो थेट पाण्यात पडला असावा. तलावातील गाळात पाय अडकल्याने बाहेर येणे शक्य झाले नसल्याने त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यूमुखी झाल्याचा प्राथमिक अंदाज नागरिक लावत आहे. काल संध्याकाळपासून गुरुदास लखू टेकाम घराकडे परतला नव्हता. सकाळी गावकऱ्यांनी मच्छी तलावाच्या काठावर त्याच्या चपला पाहिल्या. शंका आल्याने तलावात शोधमोहीम राबविण्यात आली असता त्याचा मृतदेह पाण्यात आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच विरुर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राजुरा येथे हलविण्यात आला. या घटनेने धानोरा गाव शोकमग्न झाले असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
#DhanoraTragedy #LakeAccident #ChandrapurNews #RajuraUpdates #ViralNews #BreakingNews #LocalUpdates #wirurstation #pravinchidenews #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.