Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: १० वर्षांची सेवा वाया? कर्मचाऱ्यांची ‘नियमितीकरणा’साठी गर्जना
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आरोग्य कर्मचाऱ्यांचा संताप उसळला – जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. १० सप्टेंबर २०२५) -       ...
आरोग्य कर्मचाऱ्यांचा संताप उसळला – जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १० सप्टेंबर २०२५) -
        राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती तसेच एकता संघटनेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी अखेर उग्र आंदोलनाची हाक दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला, नियमितीकरणाशिवाय चैन नाही, आमच्या सेवा कायम करा!

        राज्य शासनाने १४ मार्च २०१९ रोजी निर्णय घेऊनही अद्याप आदेशाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे हजारो कर्मचारी असंतोषाने पेटले आहेत. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ सेवा बजावत असूनही आरोग्य कर्मचाऱ्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. वेतनवाढ, ईएसआयसी, आरोग्य व अपघात विमा यांसारख्या मूलभूत सुविधांपासून कर्मचारी वंचित असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

         या आंदोलनात खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती तसेच एकता संघटनेच्या अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी ठाम मागणी केली की शासनाने तत्काळ आदेश जारी करून नियमितीकरण करावे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.

         कर्मचाऱ्यांनी केलेला आक्रोश इतका जोरदार होता की जिल्हाधिकारी कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून गेला. “आरोग्य कर्मचाऱ्यांना न्याय द्या!”, “आमचे नियमितीकरण करा!”, “दहा वर्षांची सेवा वाया जाऊ देणार नाही!” अशा गगनभेदी घोषणा आंदोलनस्थळी घुमल्या. या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील ७२३ आणि राजुरातील जवळपास ७५ कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहे. 

#HealthWorkersProtest #RegularisationNow #VoiceOfHealthStaff #ChandrapurProtest #JusticeForWorkers #HealthcareRights #FightForRegularisation #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top