आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. १२ सप्टेंबर २०२५) -
होमगार्ड कार्यालय राजुरा मार्फत हरित महाराष्ट्र – समृद्ध महाराष्ट्र अभियाना अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात राबविण्यात आला. दिनांक 12 सप्टेंबर रोजी हा उपक्रम राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घेण्यात आला. या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, पोलीस अधिकारी पवार, तालुका होमगार्ड कार्यालय राजुरा समादेशक अधिकारी शंकर शिट्टलवार, अंशकालीन लिपिक धनपालसिंग वधावन, तसेच होमगार्ड सैनिक गणेश सातघरे, नितीन सातपुते, सोपान चौधरी, रत्नाकर पायपरे, संदीप झरकर, विनोद माणुसमारे, राकेश चोथले, मुरलीधर वाढई, सुनील रामटेके आणि इतर महिला व पुरुष होमगार्ड उपस्थित होते.
होमगार्ड दलाच्या सहभागामुळे वृक्षारोपण उपक्रमाला मोठा उत्साह लाभला. उपस्थित सर्वांनी या अभियानात सामील होऊन पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली. वृक्षारोपणाच्या माध्यमातून समाजाला पर्यावरणपूरक संदेश देत “हरित महाराष्ट्र – समृद्ध महाराष्ट्र” हे स्वप्न पूर्ण करण्यास हातभार लावला. स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्थांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. होमगार्ड पथकाने केलेले हे प्रयत्न पर्यावरण संवर्धनासाठी आदर्श ठरतील, असे मत व्यक्त करण्यात आले.
#GreenMaharashtra #TreePlantation #RajuraHomeguards #SustainableFuture #EnvironmentFirst #GoGreen #CommunityService #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.