आमचा विदर्भ - दीपक शर्मा
भद्रावती (दि. १२ सप्टेंबर २०२५) -
राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशीलतेची प्रचिती दिली. नागपूर येथे आयोजित कार्यक्रमासाठी जात असताना भद्रावती येथे झालेला अपघात पाहून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपला ताफा थांबवला आणि अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. भद्रावतीजवळ एका अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार बल्लारपूर येथील प्रदीप डोके आणि घनश्याम मेश्राम (रा. विसापूर) गंभीर जखमी झाले. तेव्हाच नेमके त्या मार्गावरून आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा ताफा जात होता.
जखमींची अवस्था पाहताच ‘माणसाचे प्राण वाचवणे हेच सर्वोच्च कर्तव्य’ या भावनेतून आ. मुनगंटीवार यांनी स्वतः पुढाकार घेऊन जखमींना प्राथमिक उपचार मिळवून दिले व जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या तातडीच्या कारवाईमुळे जखमींना वेळेत उपचार मिळून जीवदान मिळाले. या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा आणि भाजपा जिल्हा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे यांनीही जखमींना रस्त्याच्या बाजूला सुरक्षित स्थळी हलवून मदत केली.
आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे कार्य केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून ते नेहमीच सामाजिक कार्यात आघाडीवर असतात. आरोग्य शिबिरे, मोफत शस्त्रक्रिया, शैक्षणिक उपक्रम, गरजूंसाठी मदत, ग्रामविकासासाठी प्रयत्न आदी उपक्रमांमधून त्यांनी लोकसेवेचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे. त्यामुळे “जनसेवा हीच ईश्वरसेवा” ही त्यांची जीवनव्रती भूमिका जनतेच्या मनाला सतत स्पर्श करत असते.
#SudhirMungantiwar #drmangeshgulwade #harishsharma #PublicService #LeaderWithHeart #CompassionInAction #JanSeva #EmergencyHelp #PeopleFirst #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.