चंद्रपूर (दि. २५ सप्टेंबर २०२५) –
पावसाळा ओसरताच चंद्रपूर–मुल महामार्गावरील मोठमोठे खड्डे वाहनधारक व नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास कठोर पाऊल उचलावे लागेल, असा स्पष्ट इशारा राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार **सुधीर मुनगंटीवार** यांनी दिला आहे.
आमदार मुनगंटीवार यांनी महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांना थेट आदेश देताना सांगितले की, “हे खड्डे बुजवणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही, तर लोकप्रतिनिधी म्हणून मी जनतेच्या सुरक्षिततेसाठी नेहमीच कटिबद्ध आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा जीव सुरक्षित राहावा, हीच खरी माझी जबाबदारी आहे. म्हणूनच हे खड्डे तात्काळ बुजवले गेले पाहिजेत.”
दरम्यान, चंद्रपूर–मुल रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती आणि सिमेंट काँक्रिटकरण करण्यासाठी आमदार मुनगंटीवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद देताना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्याबाबत आश्वासन दिले असून, याठिकाणी रेल्वे ओव्हरब्रिजलाही मान्यता मिळणार असल्याचे त्यांनी कळविले आहे. यामुळे नागरिकांना कायमस्वरूपी दर्जेदार रस्ता मिळणार असून, वाहतुकीचा दीर्घकाळाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
#sudhirmungantiwar #Chandrapur #MulHighway #RoadSafety #SudhirMungantiwar #NitinGadkari #InfrastructureDevelopment #ChandrapurNews #VidarbhaUpdates #BetterRoads #PublicSafety #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.