कोरपना (दि. ०६ सप्टेंबर २०२५) -
कोरपना नगरीत प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त ईद ए मिलादुन्नबीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पैगंबरांच्या जीवनचरित्रातून दिलेल्या शिकवणीप्रमाणे अहिंसा, शांती, सद्भावना आणि बंधुत्वाचा संदेश देत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गावातील मुख्य मार्गाने पैगंबरांच्या संदेशांची घोषणाबाजी करीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी शरबत, मिठाई, फळे आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे व युवा प्रतिष्ठान मंडळाने नगर पंचायत परिसरात मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
आमदार देवराव भोंगडे हे जुलूसमध्ये सहभागी जाले. समाजबांधवांनी मौलाना शेरखान, मौलाना रशीद, नुरानी मस्जिद कमेटीचे अध्यक्ष असरार अली यांचा सत्कार करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. रजा ॲक्शन कमेटी, वार्ड क्र.१६ ऑटो चालक वाहक संघटना, युवा खिदमत कमेटी यांनी बिरसामुंडा चौक येथे नाश्ता, पाणी, मिठाई व फळांचे वाटप केले. या कार्यक्रमात समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या जुलूसात आबिद अली, हाजी रफीक, हाजी सत्तार, सुहेल अली, मोहब्बत खान, इस्माईल शेख, शहेबाज अली, नदीम अली, अबरार अली, निसार शेख, मोहम्मद फैजान पारेख, अब्दुल वहाब, दाऊदभाई, इमरान अली, नादीर कादरी, मजीद शेख, शौकत अली, नवाज शेख तसेच संजय मुसळे, किशोर बावने, मनोहर चन्ने, विशाल गज्जलवार, अमोल आसेकर, अरुण मडावी, सुनिल देरकर आदींनी सहभाग नोंदवून शुभेच्छा दिल्या. मदरसा पंटागण येथे फातिहाखानी व सामूहिक भोजनाने या सोहळ्याचा समारोप झाला. पोलीस सहाय्यक निरीक्षक केकन राठोड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
#EidEMiladUnNabi #KorapnaCelebration #PeaceAndUnity #ProphetTeachings #Brotherhood #Harmony #CommunitySpirit #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.