Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वर्ध्यात रोजगार मेळाव्यास युवकांचा उस्फूर्त प्रतिसाद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वर्ध्यात रोजगार मेळाव्यास युवकांचा उस्फूर्त प्रतिसाद यहोवा यिरे फाऊंडेशनच्या पुढाकारातून तरुणांसाठी नवी दारे खुली “शिका, कमवा आणि प्रगती करा...
वर्ध्यात रोजगार मेळाव्यास युवकांचा उस्फूर्त प्रतिसाद
यहोवा यिरे फाऊंडेशनच्या पुढाकारातून तरुणांसाठी नवी दारे खुली
“शिका, कमवा आणि प्रगती करा” – प्रशिक्षण मेळाव्यातून स्वावलंबनाचा मंत्र
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
वर्धा  (दि. ५ ऑगस्ट २०२५) –
        शेकडो युवक-युवतींना रोजगार व व्यवसाय संधींबाबत मार्गदर्शन करणारा एक दिवसीय रोजगार व उद्योग प्रोत्साहन प्रशिक्षण मेळावा वर्धेतील शांती भवन येथे यशस्वीपणे पार पडला. यहोवा यिरे फाऊंडेशन, महाराष्ट्र उद्योगजक विकास केंद्र वर्धा आणि राष्ट्रीय उद्योग संघटन, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात वर्धा जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक तरुणांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यांना उद्योजकतेच्या संधी, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळाले. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची दिशा आणि प्रेरणा या माध्यमातून अनेकांना मिळाली. कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय उद्योग संघटनाचे महामंत्री सुनीलकुमार मांडवे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका व समुपदेशक डॉ. रत्ना चौधरी नगरे होत्या. त्यांनी युवकांमध्ये आत्मनिर्भरतेची जाणीव जागवण्यावर भर दिला.
         उद्योग मार्गदर्शन सत्रात महाराष्ट्र उद्योगजक विकास केंद्र वर्धाचे परीक्षक अनुराग वांदीले, धनश्री व नीलम यांनी सहभागी तरुणांना व्यवसायवृद्धीचे तंत्र आणि योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुञसंचालन अश्विनी पुरी यांनी केले. कार्यक्रमात यहोवा यिरे फाऊंडेशनचे सीईओ डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांनी आपल्या अनुभवातून यशोगाथा उलगडत “शिका, कमवा आणि प्रगती करा” या संकल्पनेवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी फाऊंडेशनच्या उपक्रमांचा आढावा देत अनेक तरुणांना व्यवसायासाठी दिशा दिल्याचे सांगितले.
        या मेळाव्यात पुढील भव्य रोजगार व उद्योग प्रशिक्षण मेळाव्याची घोषणा करण्यात आली असून तो १३ सप्टेंबर २०२५ रोजी अमरावती येथे होणार आहे. इच्छुकांनी लवकर नोंदणी करावी, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन यहोवा यिरे फाऊंडेशनच्या अध्यक्षा कु. एलिजा बोरकुटे, वर्धा जिल्हा समन्वयक मयूर फटीग आणि त्यांच्या टीमने अत्यंत सुस्थितीत केले. नियोजनबद्ध आणि परिणामकारक व्यवस्थापनामुळे मेळावा यशस्वी ठरला. रोजगार व स्वावलंबनाच्या दिशेने एक प्रभावी पाऊल म्हणून या प्रशिक्षण मेळाव्याचे महत्त्व अधोरेखित झाले असून, यापुढील काळात अधिकाधिक युवकांना स्वयंपूर्ण बनवण्याचा निर्धार संयोजकांनी व्यक्त केला.

#YouthEmpowerment #SkillDevelopment #EntrepreneurshipTraining #WardhaEvent #EmploymentFair #BusinessOpportunities  #LearnEarnGrow #JehovahYirehFoundation #MakeInMaharashtra #StartupIndia #YouthForChange #WardhaYouthSummit #aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur

Advertisement

Next
This is the most recent post.
Previous
थोडे जुने पोस्ट

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top