रस्त्यांवरील मुरुम, गिट्टीचा धोकादायक खेळ थांबवा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०७ ऑगस्ट २०२५) -
शहरातील रस्त्यांवर वाढलेल्या धुळीमुळे नागरिक त्रस्त असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे यावर नियंत्रण आणण्यासाठी नगर परिषद राजुरा यांना निवेदन सादर करण्यात आले. शहरातील इंदिरा नगर भागात जी.आर. कंपनीकडून मोठ्या प्रमाणात मुरुम टाकण्याचे काम सुरू आहे. याशिवाय या मार्गावरून मालवाहू टँकर आणि हायवे वाहतूकही मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. परिणामी, रस्त्यावर माती, मुरुम, खड्डे व त्यावर टाकलेली गिट्टी-रेती यामुळे सतत धूळ उडते. या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होतो आहे, तसेच गिट्टीमुळे वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यांवर नियमितपणे पाणी मारून धूळ नियंत्रणात ठेवावे, तसेच जी.आर. कंपनीच्या वाहतुकीसंबंधी नियमावली लागू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
जर प्रशासनाने तात्काळ ठोस उपाययोजना केली नाही, तर शिवसेना व युवासेना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. हे निवेदन नगर परिषद राजुरा चे मुख्याधिकारी यांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन पिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना शहर प्रमुख बंटी अरुण पिपरे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी संघर्ष वाहन चालक-मालक संघटनेचे तालुका अध्यक्ष बळवंत ठाकरे, मंगल ठाकूर, युवासेना उपतालुका प्रमुख आकाश चुणारकर, जुगल भटारकर, नहिम कुरेशी, प्रेम झाडे, गोलू पिपरे, हर्षल झाडे, आदी धोटे, बंटी शेंडे, बंटी घुबडे, रुपेश देवाडकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
#DustFreeRajura #CleanStreetsNow #RajuraRoadIssues #ShivsenaForPeople #CitizenHealthMatters #StopDustPollution #SafeRoadsRajura #GRCompanyAlert #UrbanCleanliness #YouthPowerForChange #shivsenaUBT #nitinpipare #buntypipare #aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.