अडीच वर्षांपासून अपूर्ण कामामुळे ग्रामपंचायतीचा रोष
उपसरपंच आशिष देरकर यांची जिल्हा प्रशासनाकडे तक्रार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
कोरपना / चंद्रपूर (दि. २९ ऑगस्ट २०२५) -
कोरपना तालुक्यातील स्मार्ट ग्राम बिबी येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाच्या दर्जेदार अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीने आवाज उठवला आहे. गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुमित बेलपत्रे यांना ग्रामपंचायत बिबीचे उपसरपंच तसेच सरपंच परिषद मुंबईचे जिल्हा समन्वयक आशिष देरकर यांनी प्रत्यक्ष भेटून तक्रार नोंदवली.
गावकऱ्यांच्या मेहनतीने उभे केलेले अंतर्गत रस्ते जलजीवन मिशनच्या कामामुळे फोडले गेले असून, ते तातडीने दुरुस्त करून देण्याची मागणी करण्यात आली. तब्बल अडीच वर्षांपासून हे काम सुरू असून अजूनही फक्त ५० टक्के कामच पूर्ण झाले आहे. कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे गावातील ड्रेनेज प्रणालीचे नुकसान झाले असून ती योग्य प्रकारे दुरुस्त करणे आवश्यक असल्याचेही ग्रामपंचायतीने स्पष्ट केले. यावेळी उपसरपंच आशिष देरकर यांनी इशारा देत सांगितले की, “जर तातडीने दुरुस्ती व सुधारणा केल्या नाहीत, तर ग्रामपंचायत स्तरावरून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल.”
शासनाने एकाच वेळी अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन सुरू केल्याने निधी टंचाई निर्माण झाली असून, कंत्राटदारांचे प्रलंबित देयक थकलेले असल्याने कामकाजात ढिसाळपणा दिसत असल्याचा आरोपही ग्रामपंचायतीकडून करण्यात आला. केंद्र व राज्य सरकारच्या अनियोजित धोरणांमुळे ग्रामीण जीवन संकटात आले असून प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका गावकऱ्यांना बसत असल्याचे आशिष देरकर यांनी सांगितले.
#SmartVillage #JalJeevanMission #BibiVillage #RuralDevelopment #PublicAccountability #QualityWorkMatters #AshishDerkar #VillageVoice #WaterMission #CitizenRights #korpana #smartgrampanchayat #bibi SmartVillage #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.