चंद्रपूरच्या रस्त्यावर महिला कर्मचाऱ्यांचा हुंकार
शासनाच्या दुर्लक्षाला महिलांचा निषेध
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ३० जुलै २०२५) -
लोक संचालित साधन केंद्र कंत्राटी कर्मचारी संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या वतीने महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे कार्यरत महिलांच्या न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी कार्यरत कर्मचाऱ्यांना आस्थापना खर्च म्हणून लोक संचालित साधन केंद्रांना प्रति केंद्र २५ लाख रुपये निधी शासन स्तरावरून मंजूर करावा, तसेच प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी, या मुख्य मागणीसह विविध समस्यांबाबत हे आंदोलन झाले.
सदर महामोर्चा चांदा क्लब, वरोरा नाका येथून सुरु होऊन जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे ६०० महिला कर्मचाऱ्यांच्या सहभागाने संपन्न झाला. या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय मजदूर संघाचे जिल्हा अध्यक्ष बंडु हिरवे, जिल्हा मंत्री पवन ढवळे, अनिल बडिवार, तसेच लोक संचालित साधन केंद्र कंत्राटी कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष विनोद मुंगमोडे, श्रीमती दक्षीणा हुमने, वंदना बावणे, विध्या लोखडे, सुरेश गोगले, अक्षय झाडे व सुचिता मुनघाटे यांनी केले.
मागण्यांची ठळक रूपरेषा:
- प्रत्येक लोक संचालित साधन केंद्राला २५ लाख रुपये प्रशासकीय खर्चासाठी निधी उपलब्ध करणे.
- समुदाय साधन व्यक्ती व कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करणे.
- महिला बचत गटांना खेळते भांडवल म्हणून ३०,०००/- रुपये देणे.
- राष्ट्रीयकृत बँकांमार्फत बचत गटांना ७% व्याजदराने कर्ज उपलब्ध करणे.
- केंद्र चालवण्यासाठी शासनामार्फत कोणतेही अनुदान न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे मानधन थकीत असल्याने आर्थिक संकट निर्माण.
- सदर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्य शासनास सादर करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.