Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चंद्रपूर जिल्ह्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूर जिल्ह्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था! मनसेने खड्ड्यांच्या मुद्द्यावर उचलले पाऊल आमचा विदर्भ - दीपक शर्मा  चंद्रपूर (दि. ३१ जुलै २०२५...
चंद्रपूर जिल्ह्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था!
मनसेने खड्ड्यांच्या मुद्द्यावर उचलले पाऊल
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
चंद्रपूर (दि. ३१ जुलै २०२५) -
        शहरातील मुख्य रस्त्यांपासून ते राष्ट्रीय महामार्गांपर्यंत पावसामुळे पडलेले खड्डे तातडीने बुजवावेत, अशी ठाम मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, “संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, शहरातील प्रमुख मार्गांवरच नव्हे तर राष्ट्रीय महामार्गांवर देखील मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे शालेय बस, रुग्णवाहिका, शासकीय व निमशासकीय वाहने तसेच सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची झालेली दुर्दशा पाहता अपघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे, आणि जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही.”

        या पार्श्वभूमीवर, रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्यात आणि नागरीकांना दिलासा मिळावा अशी स्पष्ट मागणी मनसेने केली. तसेच, झालेल्या कार्यवाहीचा अहवाल लेखी स्वरूपात सादर करावा असेही निवेदनात नमूद आहे. निवेदन देतांना मनसे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, मनसे जनहित कक्ष जिल्हा उपाध्यक्ष विजय तुरक्याल, मनविसे तालुका उपाध्यक्ष प्रविण शेवते, वाहतूक सेना अँटो संघटना शहराध्यक्ष असलम खान, शाखाध्यक्ष बंडू पेंदाम, मनसे कार्यकर्ता मंगेश आडे तसेच इतर मनसैनिक उपस्थित होते.
#ChandrapurPotholeCrisis #MNSDemandsAction #FixChandrapurRoads #HighwaySafetyFirst #PotholeHazardAlert #CitizensDeserveBetter #MonsoonRoadDamage

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top