Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: डाॅ. रमेशकुमार बोरकुटे यांची "महाराष्ट्र राज्य आयुक्त-समाज कल्याण जागरूकता" पदी नियुक्ती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
डाॅ. रमेशकुमार बोरकुटे यांची "महाराष्ट्र राज्य आयुक्त-समाज कल्याण जागरूकता" पदी नियुक्ती आमचा विदर्भ - दीपक शर्मा  नवी दिल्ली (दि....
डाॅ. रमेशकुमार बोरकुटे यांची "महाराष्ट्र राज्य आयुक्त-समाज कल्याण जागरूकता" पदी नियुक्ती
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
नवी दिल्ली (दि. २६ जुलै २०२५) -
        इन्टरनॅशनल वुमन राईट्स अँड क्राईम कंट्रोल कौन्सिल व मानवाधिकार एवं अपराध नियंत्रण परिषद दिल्ली यांच्या विशेष कार्यक्रमात डाॅ. रमेशकुमार एस. बोरकुटे यांची "महाराष्ट्र राज्य आयुक्त – समाज कल्याण जागरूकता" या पदावर नियुक्ती करण्यात आली. डाॅ. बोरकुटे हे यहोवा यिरे फाऊंडेशनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी असून, शिक्षण, रोजगार, आरोग्य, व्यसनमुक्ती, पर्यावरण व महिला सशक्तीकरण क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. कार्यक्रमात मुख्य अधिकारी वि.पी. सिंग यांनी सत्कार केला. देशभरातून आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बोरकुटे यांना शुभेच्छांचा वर्षाव झाला. डाॅ. रमेशकुमार बोरकुटे यांनी मनोगतात सांगितले की, “ही नियुक्ती माझ्यासाठी केवळ सन्मान नाही, तर महाराष्ट्रातील समाजकल्याणासाठी कार्य करण्याची मोठी संधी आहे.”

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top