"अंधत्वविरुद्ध आरोग्य विभागाचा मोठा निर्धार"
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. २९ जुलै २०२५) -
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत २२ जुलै ते २२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यात ‘मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र’ ही महत्वाकांक्षी मोहीम राबविली जात आहे. राज्यस्तरीय उद्घाटन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे (बोर्डीकर) यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आले. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे देखील या अभियानाचा अधिकृत शुभारंभ नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष होते जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, उद्घाटक म्हणून तर तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मंगेश गुलवाडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. तारासिंग आडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. उल्हास सरोदे, नेत्रचिकित्सक डॉ. जिनी पटेल, कार्यक्रम समन्वयक विशाल निंबाळकर उपस्थित होते.
९८ शस्त्रक्रियांद्वारे मोहिमेचा आरंभ
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण व दृष्टी क्षीणता कार्यक्रमाअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात मोतिबिंदूवरील ९८ शस्त्रक्रिया करून या अभियानाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “या मोहीमेदरम्यान ५८ शिबिरे आयोजित करण्यात येणार असून २,००० शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.”
प्रास्ताविक जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. तारासिंग आडे, सुत्रसंचालन : नेत्रचिकित्सा अधिकारी निशा चांदकेर, आभारप्रदर्शन : निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके यांनी केले. या कार्यक्रमाला मेट्रन माया आत्राम, प्राचार्य पुष्पा पोटे, मंदा बोरकर, मंगला वरखडे, सुजाता मंडल, माधुरी कुळसंगे, योगेंद्र इंदोरकर, नयना चौके, दीपक डंबारे, विकास वाढई, अनिल मल्लोजवार, कार्यालयीन कर्मचारी, वैद्यकीय व नर्सिंग स्टाफ, विद्यार्थी यांची उपस्थिती होती. जनजागृती, वेळेवर निदान व मोफत उपचाराद्वारे मोतिबिंदूचे उच्चाटन हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.