Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: १० हजार स्वप्नांना गती! चंद्रपूरात सायकल वाटपाचा भव्य उपक्रम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
१० हजार स्वप्नांना गती! चंद्रपूरात सायकल वाटपाचा भव्य उपक्रम "विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा सायकल वाटप सोहळा" आमचा वि...
१० हजार स्वप्नांना गती! चंद्रपूरात सायकल वाटपाचा भव्य उपक्रम
"विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा सायकल वाटप सोहळा"
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
चंद्रपूर (दि. २९ जुलै २०२५) -
        आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाचा भव्य समारोप स्थानिक सोहळा शकुंतला लॉन येथे उत्साहात पार पडला. या समारोप प्रसंगी ८ वी ते १० वीच्या २,०५५ विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले, तसेच विविध क्षेत्रांतील ५५ पारंपरिक गुरूजनांचा सन्मान करण्यात आला.

        या उपक्रमासाठी चंद्रपूर महानगरपालिकेचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर जोरगेवार होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, संजय चिद्रावार, भाजप महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, अमेरिकेतील भारतीय वैद्यकीय शास्त्रज्ञ अनुप वाघ, समाजसेवक संदीप बांटिया, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, ठाणेदार, रामनगर पोलिस स्टेशन आसिफ रझा शेख, तुषार सोम, प्रकाश देवतळे, अजय जयस्वाल, नामदेव डाहुळे, मंडळ अध्यक्ष रवी जोगी, सुभाष आदमाने, रवी गुरनुळे, वंदना हातगावकर, सविता दंढारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 

आमदार किशोर जोरगेवार यांचे मार्गदर्शन
        "मुलींच्या शिक्षणासाठी १० हजार सायकल वाटपाचा संकल्प आम्ही केला आहे. आज ८८ शाळांमधील २,०५५ विद्यार्थिनींना सायकल दिली गेली. ही सायकल म्हणजे फक्त वाहन नव्हे, तर त्यांच्या शिक्षणाच्या दिशेने गती देणारे साधन आहे," असे आमदार किशोर जोरगेवार (MLA Kishor Joragewar) यांनी सांगितले. 

        त्यांनी पुढे सांगितले की, "‘अम्मा की पढ़ाई’ या उपक्रमांतर्गत २८४ विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत आहोत. सेवा सप्ताहात ४०० पेक्षा अधिक सामाजिक कार्यक्रम राबवले असून, त्यातील प्रत्येक कार्यक्रम समाजात परिवर्तन घडवणारा ठरला आहे."

५५ गुरूजनांचा सन्मान
        कार्यक्रमात विविध क्षेत्रातील गुरूजनांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये वकिली, वैद्यकीय, योग, नृत्य, क्रीडा, अध्यात्म, पारंपरिक व्यवसाय यासारख्या क्षेत्रांतील व्यक्तींना गौरविण्यात आले. यात, वकिल रविंद्रजी भागवत, गायनेक डॉक्टर उषा अरोरा, योगगुरू शशिकांत मस्के, कथ्थक गुरू चारुशिला फेकडे, गरबा शिक्षक गुरुरूप मसराम, शिल्पकार सुहास ताटकंटीवार, दाई अरुणा सामंतपल्लीवार, लाठी-काठी शिक्षिका खोब्रागडे, हॉकी प्रशिक्षक जनक खान पठाण, ग्रामगीताचार्य अण्णाजी ढवस, स्वामी समर्थ संस्कार केंद्राचे सुधाकर टिपले, वेल्डर राजू वाहाडे, न्हावी शंकर चावके या सर्व गुरूजनांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. "गुरू हे समाजाचे आधारस्तंभ असतात. शिक्षण, कला, क्रीडा, आरोग्य, अध्यात्म या सर्वच क्षेत्रात गुरूंचे योगदान अमूल्य आहे," असे आमदार जोरगेवार म्हणाले.

सेवा सप्ताहातील महत्त्वाचे उपक्रम
  • ५५ रक्तदान शिबिरे – ३,००० पेक्षा अधिक रक्तदाते
  • ७५ मंदिरांमध्ये महाआरती
  • ७९ ठिकाणी योगशिबिरे
  • ६८ ठिकाणी वृक्षारोपण
  • १७ ठिकाणी शालेय साहित्य वाटप
  • रोजगार मेळावे, स्वच्छता मोहीम, आरोग्य शिबिरे
  • कावड यात्रा, रुद्राभिषेक, अम्मा संस्कार केंद्र इ.
        या कार्यक्रमात विद्यार्थिनींसह शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top