Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरात वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी शिक्षक प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरात वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी शिक्षक प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी शिक्षकांची नवकल्पनांवर आधारित तया...
राजुरात वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी शिक्षक प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप
शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी शिक्षकांची नवकल्पनांवर आधारित तयारी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. १५ जून २०२५) –
        येथील इन्फंट जिजस पब्लिक स्कूल मध्ये दिनांक २ ते १२ जून २०२५ दरम्यान वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या प्रशिक्षणात राजुरा, कोरपना, जिवती आणि गोंडपिपरी तालुक्यांतील शिक्षकांनी सहभाग घेतला. या १० दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचा उद्देश होता शिक्षकांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार आवश्यक कौशल्ये, मूल्यांकन प्रक्रिया, वेतन श्रेणी प्रणाली आणि शैक्षणिक कायद्यांबाबत सखोल मार्गदर्शन करणे.

        सदर प्रशिक्षणाचे मार्गदर्शन गटशिक्षणाधिकारी सौ. मंगला तोडे यांच्या नेतृत्वाखाली झाले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अभिजित धोटे यांचे विशेष सहकार्य लाभले. शाळेचे दोन्ही मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू व मंजुषा अलोने, तसेच अजहर सिद्दीकी यांचे नियोजनही कौतुकास्पद ठरले. प्रशिक्षण समन्वयक सावनकुमार चालखुरे (शिक्षण विस्तार अधिकारी), सहसमन्वयक विशाल शिंपी, केंद्र प्रमुख रामा पवार, नारायण तेलकापल्लीवार, प्रभाकर जुनघरे, सौ. किरण कामडी, IT समन्वयक आशिष बहादुरे आणि इतर सुलभकांनी कार्याचे उत्तम संचालन केले. समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सौ. मंगला तोडे यांनी “राष्ट्र उभारणीसाठी शिक्षक हे सर्वात महत्त्वाचे स्तंभ असून त्यांचे कौशल्यवर्धन हे काळाची गरज आहे,” असे मत व्यक्त केले.

        प्रशिक्षणात सहभागी शिक्षकांनी देखील समाधान व्यक्त करत, “आम्हाला नव्या ऊर्जा व दृष्टिकोनाची प्रेरणा मिळाली असून ही शिबिरे शिक्षकांच्या शैक्षणिक कार्यक्षमतेत निश्चितच सकारात्मक बदल घडवतील,” असे मनोगतातून सांगितले. प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मुसा शेख, लिंगोराव सोयाम, राजेश बोळे, काकासाहेब नागरे, ज्योती गुरनुले, भीमराव कोरडे, विकास गेडाम, विनोद वाघमारे, इरफान शेख, विकास भांडारवार, कैलास मेश्राम, नरसिंग पांचाळ यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. सहाय्यक म्हणून गीता जांबुलवार, देवेंद्र रहांगडाले, राजकुमार भुरे, राकेश रामटेके यांनी सहकार्य केले. संपूर्ण प्रशिक्षण उत्साही, नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top