चंद्रपूरमध्ये २५वे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १६ जून २०२५) -
उर्जानगर येथील कामगार मनोरंजन केंद्रात दिनांक २२ जून रोजी दुपारी १२ वाजता २५ व्या राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते होणार असून, सहउद्घाटक म्हणून गडचिरोलीचे खासदार डॉ. नामदेव किरसान, वरोरा-भद्रावतीचे आमदार करण देवतळे उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनाचे अध्यक्षस्थानी आदिवासी सेवक, विचारवंत दलितमित्र डी.के. आरिकर राहतील. विशेष अतिथी म्हणून डॉ. रमेशकुमार बोरकुटे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव, उपप्रादेशिक अधिकारी उमाशंकर भादुले, सीटीपीएसचे मुख्य अभियंता विजय राठोड, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, म.रा.वि.म.चे महाव्यवस्थापक नंदकिशोर पांडे, आरटीओ किरण मोरे, दालमिया सिमेंटचे प्रणवकुमार नायक, टेमराज माले, डॉ. बळवंत भोयर, डॉ. तुकाराम धोबे, रिनाताई पांडे, अर्चना राठोड आदींची उपस्थिती राहणार आहे.
या संमेलनात "पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी उपाय" या विषयावर विविध सत्रांत चर्चा होणार आहे. यावेळी पर्यावरण रत्न, पर्यावरण भूषण, पर्यावरण मित्र आणि समाजभूषण पुरस्कारांचे वितरण तसेच विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येईल. संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी हरीश ससनकर, डॉ. देव कन्नाके, आशिष येडांगे, संक्षिप्ता शिंदे, विद्या चित्ताडे, सुधीर कोरडे, राजेश सोलापन, शालिनी महाकुलकर, अनुराधा जोशी, अनुपमा बुजाडे, सुरेश शर्मा आणि प्रदीप अडकीने यांनी परिश्रम घेतले आहेत. पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.