Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गोवरी सेंट्रलच्या सेक्शन-7 अंमलबजावणीसाठी शिवसेनेचे निवेदन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गोवरी सेंट्रलच्या सेक्शन-7 अंमलबजावणीसाठी शिवसेनेचे निवेदन काम बंद आंदोलनाची चेतावणी कामगार नेते बबन उरकुडे यांचे वेकोली प्रशासनास अल्टीमेटम...
गोवरी सेंट्रलच्या सेक्शन-7 अंमलबजावणीसाठी शिवसेनेचे निवेदन
काम बंद आंदोलनाची चेतावणी
कामगार नेते बबन उरकुडे यांचे वेकोली प्रशासनास अल्टीमेटम
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २५ जून २०२५) –
        गोवरी सेंट्रल कोळसा प्रकल्प मागील अनेक महिन्यांपासून रखडला असून, संबंधित कामकाज अद्यापही सेक्शन ४ पुढे सरकलेले नाही. दरम्यान, नव्याने सुरू झालेला गोवरी पोवणी अंमलगन प्रकल्प मात्र सेक्शन ९ पर्यंत पोहोचलेला आहे. या पार्श्वभूमीवर, प्रकल्प प्रभावित शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकरणी शिवसेना नेते व माजी जिल्हाप्रमुख बबन उरकुडे यांच्या नेतृत्वाखाली, गोवरी सेंट्रल कोळसा प्रकल्प संघर्ष समिती व एचएमएस यूनियन बल्लारपूर एरिया यांच्या संयुक्त विद्यमाने बल्लारपूर येथील मुख्य महाप्रबंधकांना निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनात सात दिवसांची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत सेक्शन-7 सुरू न झाल्यास तीव्र रेल्वे सायडींग बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

        यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये माजी उपजिल्हाप्रमुख (शिवसेना) व एचएमएस यूनियन बल्लारपूर एरिया महामंत्री बबन उरकुडे, शंकर पारखी, उईके, गोयेगावचे उपसरपंच स्नेहल पडवेकर, मारोती चन्ने, अखिल लोनगाडगे, धनंजय सातपुते, साईनाथ लांबट, सूरज गाडवे, अजय गौरकर, शिशिर लांडे, साहिल राखुंडे, मिलिंद लोहे तसेच समस्त गोवरी सेंट्रल प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकल्पाची प्रगती ठप्प झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढत असून, प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन सेक्शन ७ सुरु करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top